ETV Bharat / state

ऊसाला चार हजार रुपये एफआरपी द्यावा; सांगलीत शेतकरी संघटनेने बंद पाडली ऊसतोड - sugarcane price agitation sangli

शेतकऱ्याच्या ऊसाला 4 हजार रुपये एफआरपी जाहीर करावा, अन्यथा एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सांगलीत शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.

farmers organisation agitation over sugarcane price in sangli
ऊसाला चार हजार रुपये एफआरपी द्यावा; सांगलीत शेतकरी संघटनेने बंद पाडली ऊस तोड
author img

By

Published : Oct 17, 2020, 4:08 PM IST

Updated : Oct 17, 2020, 4:38 PM IST

सांगली - ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे. रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने मिरज तालुक्यातील ऊसतोड बंद पाडत कर्नाटक राज्यातील कारखान्यांकडे जाणारा ऊस रोखला आहे. तसेच शेतकऱ्याच्या ऊसाला 4 हजार रुपये एफआरपी जाहीर करावा, अन्यथा एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.

याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली.

महाराष्ट्रात अजून ऊसगाळप हंगाम सुरू झालेला नाही. मात्र, सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटक राज्यात कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यात ऊसतोड सुरू आहे. मात्र, अद्यापही महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये उसाचा एफआरपी जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने ऊस आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज (शनिवारी) ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये पडली. रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने बेडग नजीकच्या वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली आहे.

हेही वाचा - 'अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त, तातडीच्या मदतीसह ओला दुष्काळ जाहीर करा'

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते महादेवअण्णा कोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाच्या फडात जाऊन ऊसतोड बंद पाडत, तोडणी मजुरांना पिटाळून लावले. अद्याप कोणत्याही कारखान्याने उसाचा दर जाहीर केला नाही. आधीच शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या परिस्थितीचा फायदा उठवत कारखानदार शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेने केले. तसेच यामुळे शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही. राज्य शासनाने, कारखानदारांनी पुढे येऊन ऊसाचा दर जाहीर केला पाहिजे. त्याचबरोबर ऊस तोडणी आणि वाहतूकदारांचे दरही वाढवून दिले पाहिजेत, अशा मागण्याही संघटनेने केल्या.

Last Updated : Oct 17, 2020, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.