ETV Bharat / state

'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्या नेत्याला 'शॉक' द्या, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला - etv bharat live

महापालिकेत 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्या नेत्याला तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. आता एकदा 'मोठा शॉक'द्या, तुम्हाला खऱ्या सोन्याचे मुकुट घालीन, अशी ऑफर देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Oct 19, 2021, 7:45 AM IST

सांगली - सांगली महापालिकेत 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्या नेत्याला तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. आता एकदा 'मोठा शॉक'द्या, तुम्हाला खऱ्या सोन्याचे मुकुट घालीन, अशी ऑफर देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. नुकतेच सांगली महापालिकेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती सभापती निवडीत भाजपने वर्चस्व राखले आहे. याबद्दल भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदाधिकारयांचा सत्कार करण्याता आला. त्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शॉक द्या,आणि मिळवा सोन्याचे मुकुट

महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजप सोडून गेलेल्यांना परतण्याचे आवाहन करत, महापालिकेच्या सभापती निवडीत तुम्ही करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या नेत्याला दोन छोटे शॉक दिले आहेत. मात्र आता पुढच्या निवडणूकीत करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या 'त्या'नेत्याला मोठा शॉक द्या. दरम्यान, असा शॉक देणाऱ्या नेतृत्वाला, कार्यकर्त्याला आपण खऱ्या सोन्याचा मुकुट घालून, सत्कार करू, अशी थेट ऑफर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जाहीर केली आहे. जलसंपदा मंत्री यांच्यावर नाव न घेता जिल्ह्यातल्या स्थानिक भाजपा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी सध्या पार होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने ही ऑफर जाहीर केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Unlock : दिवाळीपूर्वी 'गोड' बातमी.. राज्यातील निर्बंध आणखी शिथील, उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.