सांगली - जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. ( Continuous rainfall in the Sangli district )गेल्या 24 तासात सरासरी 2.2 मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शिराळा तालुक्यात 10.04 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 दिवसात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे तीन दिवसात चांदोली ( वारणा ) धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन 14.63 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या 24 तासात सरासरी 2.2 मि. मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 10.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे. तर चांदोली ( वारणा ) धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 34 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात तीन दिवसांपूर्वी 10 टीएमसी इतका पाणीसाठा होता. मात्र संततधार अतिवृष्टीमुळे पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. सध्या 14.63 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.1 (100.4), जत 0.3 (97.2), खानापूर-विटा 0.6 (92.9), वाळवा-इस्लामपूर 2.1 (101), तासगाव 1.4 (81.9), शिराळा 10.4 (261), आटपाडी 0.1 (70.6), कवठेमहांकाळ 2.1 (85.6), पलूस 2.1 (62.8), कडेगाव 0.5 (80.8).