ETV Bharat / state

CM siddaramaiah On BJP : महाराष्ट्रातील शिंदे भाजप सरकार उखडून टाका - सिद्धरामय्या - सांगलीत आज काँग्रेसचा महानिर्धार मेळावा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. देशासह महाराष्ट्रातील शिंदे भाजप सरकार भ्रष्ट आहे. त्यांना महाराष्ट्रातून मुळासकट उखडून फेकायला हवे असा हल्लाबोल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. सांगलीत आज काँग्रेसचा महानिर्धार मेळावा पार पडत आहे. यावेळी सिद्धरमय्या यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Karnataka CM Maharashtra Visit
सांगलीत काँग्रेसचा महानिर्धार मेळावा
author img

By

Published : Jun 25, 2023, 1:09 PM IST

Updated : Jun 25, 2023, 4:24 PM IST

सांगली : मुळासकट भाजपाला फेकून देण्याची गरज असून ती जवाबदारी सर्वांची आहे. कर्नाटकमध्ये आम्ही भाजपला मुळासकट फेकून दिले आहे. कर्नाटक राज्यात भाजपा कधीही जनतेच्या आशीर्वाद घेऊन निवडून आले नाही, केवळ ऑपरेशन कमळ आणि आमदार खरेदी करून सत्तेवर आले. ऑपरेशन कमळ हे आमदार खरेदी विक्रीचे उद्योग असल्याची टीका कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धारमया यांनी भाजपवर केली आहे. कोट्यवधी खोके देऊन आमदार खरेदी करण्याचे काम भाजपा करत आहे. महाराष्ट्रतील शिदे-फडणवीस सरकार देखील भ्रष्ट आहे. शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रातुन कोणत्याही परिस्थितीत नेस्तनाबूत करून उखडून टाकले पाहिजे असे मत सिद्धरमय्या यांनी व्यक्त केले आहे.

देशातील भाजपा सरकार नालायक : देशात असो किंवा राज्यातील भाजपा सरकारला विकासाचे धोरण नाही, फक्त त्यांचा उद्योग लाच घेण्याचा सुरु आहे. देशातील भाजपा सरकार हे नालायक सरकार आहे. प्रत्येक कुटुंबाला मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे, पण केंद्रातील भाजपा सरकारने फूड कॉर्पोरेशनला कर्नाटक राज्याला तांदूळ देऊ नये, अशी ताकीद दिली आहे. गरीब जनतेल फुकट तांदूळ मिळू नये,असा प्रयत्न असून तांदूळ वाटपमध्ये भाजपा सरकार राजकारण करत असल्याचा आरोप सिद्धरमय्या यांनी केला आहे. केंद्राकडे आम्ही फुकट तांदूळ मागत नाही,तर तांदूळ विकत घेऊन आम्ही मोफत वाटणार आहे. पण केंद्रातिल भाजपा सरकार गोरगरिबांच्या विरोधातील सरकार आहे.

भाजपा सरकार नेस्तनाबूत करा : कर्नाटक सरकारने पदवीधरांना बेरोजगार भत्ता देण्याचे काम करत आहे. देशाच्या इतिहासातील खोटे बोलणार पंतप्रधान कोण असले तर ते नरेंद मोदी यांचा नबंर एक आहे. माझ्या आयुष्यात असे खोटे बोलणारे पंतप्रधान मी कधीच पाहिलेले नाही अशी टीका देखील सिद्धरमय्या यांनी मोदींवर केली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भाजपा सरकार नेस्तनाबूत करून उघडून टाकण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी वाटपाचे योजना आहे. त्या योजनेबाबत चर्चा करून, त्या ठिकाणी पाणी देण्याचे काम करण्यात येईल असे देखील सिद्धरमय्या म्हणाले.

राज्यात काँग्रेसचे सरकार : महाराष्ट्रात येणारे सरकार आमचे राहणार अशी खात्री माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्यातील सरकारकडून फक्त घोषणा सुरू आहेत, पण प्रत्यक्षात काम नाही, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरयांना अद्याप मदत नाही, फक्त जाहिरातवर खर्च चालू असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजपचा केवळ जाहीरातुन खोटा-नाटा प्रचार सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून राज्य घटनेचे काय होणार आहे ? याची भीती वाटत आहे. भाजपा सरकारकडून लोकशाहीची गळचेपी सुरू आहे.

भाजपन बजरंग बलीचा अपमान केला : अदिपुरुष चित्रपटामध्ये बजरंग बलीचा अपमान करण्याचे पाप भाजपाकडून करण्यात आले. आता त्यांच्या सोबत बजरंग बाली नाही, श्रीराम देखील नाही. राज्यातील असंवैधानिक सरकारने वारकरयांवर लाठी हल्ला करायला लावला. पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगांचा अपमान राज्य सरकारकडून सुरु असल्याचा घाणाघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी केला आहे. हे सरकार जाहिरातीचे सरकार आहे, जाहिरात करुन पंढरपूरमध्ये पांडुरंगाचा आपमान करत राज्यातील देव देवतांचा अपमान यांनी केला आहे. असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे. या सरकारला आमचा खुला इशारा आहे. पांडुरंगाचा अपमान काँग्रेस खपवून घेणार नाही. भाजपला धडा शिकवण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

सिद्धरामय्या यांचा भव्य सत्कार : कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा भव्य सत्कार आणि महानिर्धार मेळावा सांगलीमध्ये आज झाला. यावेळी बोलताना कर्नाटकचे यशस्वी सूत्र आम्ही महाराष्ट्रात राबवून भाजपाचे शेतकरी विरोधी सरकार उलथून पाडू. सिद्धरामय्या यांच्या उपस्थित पार पडणारी सभा ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची नांदी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय निश्चित आहे. परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

भाजपाला सत्तेतून हाकलून देणार : लोकशाहीची नीती आणि लोकशाहीच्या प्रक्रियेतून भाजपाला केंद्रात जनतेने सत्ता दिली. या मंडळींनी लोकशाहीची मूल्ये बाजूला ठेवून हुकूमशाहीच्या दिशेने या देशाची सत्तेचा गैरवापर केला. कर्नाटक सरकारने सांगली जिल्ह्यातील जतच्या दुष्काळी भागाला शेजारच्या त्यांच्या राज्यातून पाणी द्यावे. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील 2024 मध्ये निकाल लागल्याशिवाय राहणार नाही. दांडी यात्रेने इंग्रजाना देशातून हाकलून दिले. राहुल गांधींच्या भारत जोडे यात्रेमुळे आता देशातील भाजपाला सत्तेतून हाकलून दिल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ता गप्पा राहणार नाही. अलमट्टी धरणातले पाणी सोडत राहावे. कर्नाटक राज्याने महाराष्ट्रासोबत राहावे. सिमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटक सरकारने न्याय द्यावा. सिद्धरामय्या यांच्या सभेमुळे आम्हाला बळ मिळाले आहे. नक्कीच सांगली जिल्ह्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजपाचा पराभव करू, अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.

सत्कार सोहळा सांगलीमध्ये : काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयानंतर मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर सिद्धरमय्या महाराष्ट्राचा हा पहिलाच सत्कार सोहळा सांगलीमध्ये संपन्न होत आहे. त्यामुळे या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाराष्ट्रा दिग्गज नेते आणि कर्नाटकातील मंत्री उपस्थित आहेत. या सत्काराच्या निमित्ताने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सांगली शहरातून जंगी रॅली देखील काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या राजमती क्रीडांगणावर हा महानिर्धार मेळावा संपन्न होत आहे. यानिमित्ताने काँग्रेसकडून आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे, तर या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. CM Siddaramaiah Letter : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी लिहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
  2. Karnataka Election Result : कर्नाटकातील निकालावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया ; जयराम रमेश म्हणाले - जनतेने मोदींना नाकारले
  3. Karnataka CM decision : कोण होणार कर्नाटकाचा मुख्यमंत्री उत्तरासाठी पाहावी लागेल 72 तास वाट; रणदीप सुरजेवालांनी दिली नवी अपडेट

Last Updated : Jun 25, 2023, 4:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.