सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये विश्वजीत कदम पलूस-कडेगाव तर जतमधून विक्रम सावंत या दोघांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज आणि खानापूर-विटा मतदार संघातील उमेदवारी अजून गुलदस्त्यात आहे.
काँग्रेसकडून राज्यातल्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये सांगली जिल्ह्याच्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघातील उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातून विश्वजीत कदम यांच्या उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तर दुसर्या बाजूला जत मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा... काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
विश्वजीत कदम हे काँग्रेसचे पलूस-कडेगावचे विद्यमान आमदार आहेत. कदम यांना दुसऱ्यांदा काँग्रेसकडून उमेदवारीची संधी मिळाली आहे. नुकतेच पतंगराव कदम यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती आणि याठिकाणी ते बिनविरोध निवडून आले होते.
जत या मतदारसंघातून काँग्रेसकडून पुन्हा विक्रम सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीत विक्रम सावंत यांनी भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या विरुद्ध जोरदार लढत केली होती. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात विक्रम सावंत यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनासाठी केले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे काँग्रेस पक्षाने पुन्हा त्यांनाच या ठिकाणी संधी दिली आहे.
हेही वाचा... रत्नागिरीत पाचही जागांसाठी शिवसेनेकडून उमेदवारांना 'एबी फॉर्म'
सांगली जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील काँग्रेसने अजून उमेदवारी जाहीर केली नाही. सांगली, मिरज आणि खानापूर-आटपाडी काँग्रेसच्या वाट्याला असणाऱ्या तीन जागा आहेत. सांगलीमध्ये सध्या उमेदवारीवरून जोरदार गटबाजी सुरू आहे, तर मिरजमध्ये काँग्रेसकडे भाजपाचे मंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही. यामुळे खानापूर-आटपाडीमध्ये उमेदवारी कोणाला ? हा प्रश्न आहे.