ETV Bharat / state

'काँग्रेसने दहशतवाद्यांसोबत ईलू - ईलू करावे, पण भाजप असेपर्यंत काश्मीर वेगळा होऊ देणार नाही' - दहशतवाद

भाजप असेपर्यंत काश्मिरला देशापासून वेगळे होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिला. काँग्रेसने दहशतवाद्यांसोबत ईलू-ईलू करत बसावे मात्र भाजप दहशतवाद खपवून घेणार नसल्याचेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

अमित शाह
author img

By

Published : Apr 17, 2019, 7:59 PM IST

Updated : Apr 18, 2019, 12:03 AM IST

सांगली - काँग्रेसने दहशतवाद्यांसोबत ईलू-ईलू करत बसावे, मात्र भाजप असेपर्यंत काश्मिरला देशापासून वेगळे होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिला. काश्मीरला वेगळे करण्याची बोलले जात असताना राहुल गांधी आणि शरद पवार यांची भूमिका काय आहे, असा सवालही शाह यांनी केला. सांगली जिल्ह्यातील तासगावात संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

अमित शाह

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, की देशाला फक्त नरेंद्र मोदी वाचवू शकतात. त्यामुळे देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींना साथ द्या, असे आवाहन शाह यांनी केले. देशात सोनिया गांधी आणि मनमोहन सरकारने कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केले. मात्र गेल्या पाच वर्षात आमच्यावर एकही रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला नाही. 60 वर्षात काँग्रेसच्या काळात जनतेला केवळ लुटण्यात आले, असा आरोप शाह यांनी यावेळी केला. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका करताना राहुलबाबा आणि पवार यांना आता गरिबांची आठवण येत आहे. पण पिढ्यांन-पिढ्या राज्य केले, त्यावेळी काय केले असा सवाल शाह यांनी केला. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात गॅस, वीज कनेक्शन, घरे मोफत दिली असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 15 वर्षात वैभवशाली महाराष्ट्राचा कोणताच विकास काँग्रेस आघाडीच्या काळात झाला नाही. मात्र गेल्या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस आणि युती सरकारने महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिले असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काश्मिरचे नेते उमर अब्दुल्ला यांना देशात दोन पंतप्रधान करण्याचे केलेल्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. राहुल गांधी आणि शरद पवारांवर त्यांनी निशाणा साधला. देशात दोन पंतप्रधानांची भाषा करत देशापासून काश्मीरला तोडण्याचा प्रयत्न करत असताना राहुल गांधी आणि शरद पवार यांची काय भूमिका आहे, असा सवालही शाह यांनी उपस्थित केला.

पुलवामा हल्ला आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकबाबत बोलताना, ते म्हणाले, की पुलवामा हल्ल्यानंतर मोदी काय करणार असा प्रश्न निर्माण झाला. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या चिंधड्या केल्या. यामुळे देशात आणि जगात देशाची मान उंचावली गेली आहे. कारण जगात बदला घेण्यासाठी केवळ या अमेरिका आणि इस्राईल देशांची ओळख होती. आता भारताचाही या देशांच्या बरोबर समावेश झाला आहे. ही गर्वाची बाब असल्याचे मत शाह यांनी व्यक्त केले. त्यामुळे येथून पुढे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या गोळीला यापुढे गोळ्याने उत्तर मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या देशाला नरेंद्र मोदीच वाचवू शकतात आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपच्या संजयकाका पाटील यांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी शाह यांनी केले.

Intro:
सरफराज सनदी - सांगली .

AVBB

feed send - file name - R_MH_1_SNG_17_APR_2019_AMIT_SHAHA_ON_CONGRESS_SARFARAJ_SANADI - TO -
R_MH_4_SNG_17_APR_2019_AMIT_SHAHA_ON_CONGRESS_SARFARAJ_SANADI

स्लग - भाजपा असे पर्यंत काश्मीर वेगळा होऊ देणार नाही, काँग्रेसने मात्र आतंकवादयांसोबत ईलु -ईलु करत बसावे - अमित शहा .

अँकर - काँग्रेसने आतंकवादयांसोबत ईलु-ईलु करत बसावे,मात्र आम्ही काश्मिरीला देशापासून कदापी वेगळे होऊ देणार नाही,असं इशारा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देत काश्मीरला
वेगळी करण्याच्या भाषा होतं असताना,
राहुल गांधी आणि शरद पवार यांची भूमिका काय आहे,असा सवालही शहा यांनी केला आहे.तसेच देशाला फक्त नरेंद्र मोदी वाचवू शकतात,त्यामुळे देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदींना साथ द्या असे आवाहन शहा यांनी केले आहे.ते आज सांगलीच्या तासगाव मध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

Body:व्ही वो - सांगली लोकसभेचा प्रचार आता शिगेला पोहचत आहेत.भाजपा कडून दिगग्ज नेते सांगली लोकसभेच्या मैदानात उतरत आहेत.आज भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा पार पडला.याप्रसंगी संजयकाका पाटील,आमदार सुधीर गाडगीळ,यांच्यासह भाजपा-युतीचे नेते ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना शहा यांनी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.देशात सोनिया गांधी आणि मनमोहन सरकारने कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार केले,मात्र गेल्या पाच वर्षात आमच्यावर एक ही रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला नाही.६० वर्षात काँग्रेसच्या काळात जनतेला केवळ लुटण्यात आले असा आरोप शहा यांनी यावेळी केला.तर राहुल गांधी आणी शरद पवार यांच्यावर टीका करताना राहुलाबाबा आणि पवार यांना आता गरिबांची आठवण येत आहे,पण पिढ्यां-पिढ्या राज्य केले त्यावेळी काय केले असा सवाल शहा यांनी केला , मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात गॅस, वीज कनेक्शन ,घरे मोफत दिली असं स्पष्ट केले.तर गेल्या १५ वर्षात वैभवशाली महाराष्ट्राचा कोणताच विकास काँग्रेस आघाडीच्या काळात झाला नाही ,मात्र गेल्या ५ वर्षात देवेंद्र फडणावी आणि युती सरकारने महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिले आहे.असा विश्वास यावेळी शहा यांनी व्यक्त केले.

तर काश्मिरचे नेते उमर अब्दुल्ला यांना देशात दोन पंतप्रधान करण्याचे केलेल्या विधानाचा समाचार घेतना राहुल गांधी आणि शरद पवारांवर निशाणा साधला देशात दोन पंतप्रधानांची भाषा करत देशाला काश्मीरला तोडण्याची प्रयत्न करत असताना राहुल गांधी आणि शरद पवार यांची काय भूमिका आहे.असे सवाल शहा यांनी उपस्थित करत,काँग्रेसने आतंकवादयांसोबत ईलु-ईलु करत बसावे आम्हाला काही हरकत नाही,पण भाजपा सत्तेत येणार आहे, मात्र जरी आली नाही,
तरीही भाजपा जो पर्यंत आहे,तो पर्यंत काश्मीरला वेगळे होऊ देणार नाही.असा इशारा दिला आहे.

तर पुलवामा हल्ला आणि बालकोट सर्जिकल स्ट्राईक बाबत बोलताना , पुलवामा हल्ल्यानंतर मोदी काय करणार असा प्रश्न निर्माण झाला असताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादयांच्या चिंधड्या केल्या.यामुळे देशात आणि जगात देशाची मान उंचावली गेली आहे.कारण जगात बदला घेण्यासाठी केवळ या अमेरिका आणि इस्राईल देशांची ओळख होती,आता भारताचाही या देशांच्या बरोबर समावेश झाला आहे.आणि ही गर्वाची बाब असल्याचे मत शहा यांनी व्यक्त केले.
त्यामुळे येथून पुढे पाकिस्तान आणि दहशतवादयांच्या गोळीला यापुढे गोळयाने उत्तर मिळेल.असं स्पष्ट करत या देशाला नरेंद्र मोदीच वाचवू शकतात आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपच्या संजयकाका पाटील यांनी विजयी करा असे आवाहन यावेळी शहा यांनी केले .

Conclusion:
Last Updated : Apr 18, 2019, 12:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.