कराड (सांगली) - लोकसभा मतदार भाजपचे कमळ फुलविणारे खासदार संजय पाटील ( BJP MP Sanjay Patil ) हे कराड विमानतळावरून राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( NCP leader Jayant Patil ) यांच्या गाडीतून जाताना पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने जिल्ह्यातील राजकारणात नवनवे अंदाज व्यक्त होऊ लागले ( Jayant Patil with Sanjay Patil ) आहेत.
कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरासाठी जयंत पाटील होते कराड दौर्यावर- कराड तालुक्यातील घारेवाडी येथे बुधवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबीर आयोजित ( NCP program in Sangli ) करण्यात आले होते. त्यासाठी जलसंपदा मंत्री मुंबईतील कॅबिनेट बैठक ( Mumbai cabinet meeting ) संपवून विमानाने कराडच्या विमानतळावर दाखल झाले. तत्पुर्वी सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील विमानतळावर येऊन थांबले ( Sangli Airport ) होते. जयंत पाटील आल्यानंतर दोघांनी विमानळावरील विश्रामगृहात ब्लॅक टी घेतला. दोघे एका गाडीत बसून विमानतळावरून बाहेर पडले. त्यांनी कुठंपर्यंत एकत्रित प्रवास केला, याची ठोस माहिती मिळू शकली नाही. मात्र, जयंत पाटील हे घारेवाडीतील नियोजित कार्यक्रमाला उपस्थित होते.
संजय पाटील यांचा राजकीय प्रवास, काँग्रेस ते भाजप व्हाया राष्ट्रवादी- युवक काँग्रेसमधून संजय पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. 1999 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून त्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. 2004 च्या विधानसभा निवडणुकीतही अपक्ष म्हणून संजय पाटील यांनी आव्हान दिले. मात्र, आर. आर. पाटील यांनीच बाजी मारली. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. राष्ट्रवादीला राम राम करून 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिली. वसंतदादा पाटलांचे नातू आणि काँग्रसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. 2019 ला पुन्हा ते खासदार झाले.
काँग्रेसच्या मुशीत घडलेला नेता झाला भाजपचा खासदार- खासदार संजय पाटील हे काँग्रेसच्या मुशीत घडले आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ते विधानसभेचे उमेदवार असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा संजय पाटील यांना वरदहस्त होता. 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर आर. आर. पाटील यांचे काँग्रेसमधील कडवे विरोधक म्हणून संजय पाटील ओळख निर्माण झाली. मात्र, त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत आर. आर. आबांचा पराभव करता आला नाही. राष्ट्रवादीने त्यांना पक्षात घेऊन विधान परिषदेवर संधी देत विरोध संपवला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करत संजयकाकांनी संसदेत प्रवेश केला.
मी भाजपाचा खासदार आहे, त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही, असा ठाम विश्वास भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
हेही वाचा-रुग्णांची लूट केलेल्या रुग्णालयांविरोधात खासदार संजयकाका पाटील आक्रमक
हेही वाचा-rajya sabha election 2022: महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार विजयी होईल!
हेही वाचा-Rajya Sabha elections : अफवा पसरवून परिवर्तन होईल असे, भाजपला वाटतय - जयंत पाटील