सांगली - प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत सैराटसारख्या घटना ( Sairat Movie Incidence Love Marraige ) अजूनही घडत आहेत. असाच एक प्रकार मिरजेत घडल्याचे समोर आला आहे. प्रेमविवाह ( Love Marriage ) केलेल्या एका तरुणावर प्राणघातक हल्ला करूण्यात आला आहे. ( Attack on Youngster who done Love Marriage ) यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
प्रेम विवाह केलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला -
मिरजेत सैराटचा थरार पहायला मिळाला आहे. प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांकडून एका तरुणावर प्राण घातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी दोघे संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एक ते दीड महिन्यांपूर्वी मिरजेतील एका तरुणाने भडकंबे तालुक्यातील तरुणीशी प्रेम विवाह केला. त्यांनंतर दोन दिवसापूर्वी या जोडप्याच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. त्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास तो तरुण घरी निघाला असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हा तरुण गंभीर आहे. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिरज शहर उपविभागीय अधिकारी अशोक वीरकर यांनी दिली आहे.