ETV Bharat / state

मदत देता का मदत? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची ठाकरे सरकारकडे याचना - victims demand

शासनाच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापूराची मदत मिळणार का? असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या महापूराची मदत मिळाली नाही, यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. मात्र अद्याप या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. यंदा तरी मदत मिळावी, अशी याचना येथील झोपडपट्टी धारक पूरग्रस्त टाहो फोडून ठाकरे सरकारकडे करत आहेत.

मदत देता का मदत ?
मदत देता का मदत ?
author img

By

Published : Jul 31, 2021, 5:16 PM IST

सांगली - शासनाच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापूराची मदत मिळणार का? असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या महापूराची मदत मिळाली नाही, यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. मात्र अद्याप या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. यंदा तरी मदत मिळावी, अशी याचना येथील झोपडपट्टी धारक पूरग्रस्त टाहो फोडून ठाकरे सरकारकडे करत आहेत.

मदत देता का मदत? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची ठाकरे सरकारकडे याचना

पुराने झोपडपट्टी उद्ध्वस्त
सांगली शहरानजीक असणाऱ्या अंकली गावात 40 कुटुंबांची वस्ती आहे. झोपडपट्टी म्हणून त्याला ओळखले जाते. कृष्णा नदीकाठी असणाऱ्या या वस्तीमध्ये पूर आला की पाणी शिरते, यंदाच्याही महापुरात अंकली गावाबरोबर गावातली ही झोपडपट्टी बुडाली. त्यामुळे झोपडपट्टीतील कुटुंबांची घरं अक्षरशा उद्ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाण्याने थैमान घालत हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या घराची अवस्था ही होत्याची नव्हती केली आहे.

मुख्यमंत्री साहेब तुम्हीच दखल घ्या -
कोणाच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत, कुणाचे छत कोसळले आहे, त्याचं घरच कोसळले आहे, अशी विदारक परिस्थिती झोपडपट्टीवासीयांचे झाली आहे. मात्र यांना शासनाची मदत मिळेल की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण अंकली ग्रामपंचायतीकडून या झोपडपट्टी धारकांना शासनाच्या जागेवर घर असल्याने मदत मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापुराने उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबांचा संसार पुन्हा उभा राहणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 50 वर्षाहून अधिक काळापासून याठिकाणी या झोपडपट्टया आहेत. 2019 मधल्या महापुराचे या ठिकाणी असणाऱ्या घरांची मोठी पडझड झाली होती. 2019 मधील पुराची मदत अद्याप मिळाली नाही. आता तरी या लोकांची घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. शासनाकडून पडझड झालेल्या घरांच्या उभारणीसाठी मदत देण्यात येते. मात्र इथल्या झोपडपट्टी धारकांना ती मिळणार का नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टाहो फोडून झोपडपट्टी धारक ठाकरे सरकारला मदत द्यावी, अशी याचना करताना पाहायला मिळत आहेत.

सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना -
दरम्यान, याबाबत अंकली पंचायत समिती सदस्या खवाटे यांच्याशी संपर्क साधला असता, गावातली सरसकट सर्व पंचनामे करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे होऊन सर्वांना ही मदत मिळेल आणि ते शंभर टक्के मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अंकली ग्रामपंचायतीकडून असे काही सांगण्यात आले आहे का ? याबाबतची आपणास कल्पना नाही, त्याची माहिती घेतली जाईल. पण प्रत्येकाला मदत मिळण्याच्या दृष्टीने 100 टक्के पंचनामे करून मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे खवाटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - VIDEO : अन् चिखली गावातल्या पुरग्रस्ताने फडणवीस, चंद्रकांत पाटलांना सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.