ETV Bharat / state

Sangli Municipal Budget : करवाढ नसलेला 743 कोटींचा अर्थसंकल्प सादर, विद्यार्थ्यांसह महिलांसाठी विशेष योजना जाहीर

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा 743 कोटी रुपयांचा ( Sangli Municipal Corporation budget ) अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती निरंजन आवटी ( Standing committee chairman Niranjan Awate ) यांनी विशेष महासभेत महापौरांकडे सादर केला. तत्पूर्वी प्रदूषण टाळा आणि इलेक्ट्रॉनिक वाहन वापरा संदेश देण्यासाठी सभापती निरंजन आवटी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस ( BMC commissioner Nitin Kapadnis ) यांच्यासह अधिकाऱ्यांनी ई-बाईकवरून दाखल होत महासभेत अर्थसंकल्प सादर केला.

सांगली महापालिका अर्थसंकल्प
सांगली महापालिका अर्थसंकल्प
author img

By

Published : Mar 30, 2022, 8:44 PM IST

Updated : Mar 30, 2022, 9:21 PM IST

सांगली - सांगली महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष सभेमध्ये सादर करण्यात आला आहे. 743 कोटी रुपयांचा आणि कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती आणि महापालिकेचे आयुक्त यांनी ई-बाईकवरून येत सादर केले आहे. विद्यार्थी, मुली आणि आशा सेविका यांच्यासाठी विशेष योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

कोणतीही करवाढ नसलेले अर्थसंकल्प सादर...
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा 743 कोटी रुपयांचा ( Sangli Municipal Corporation budget ) अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती निरंजन आवटी ( Standing committee chairman Niranjan Awate ) यांनी विशेष महासभेत महापौरांकडे सादर केला. तत्पूर्वी प्रदूषण टाळा आणि इलेक्ट्रॉनिक वाहन वापरा संदेश देण्यासाठी सभापती निरंजन आवटी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस ( BMC commissioner Nitin Kapadnis ) यांच्यासह अधिकाऱ्यांनी ई-बाईकवरून दाखल होत महासभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करवाढ नसलेला 743 कोटींचा अर्थसंकल्प सादर

हेही वाचा-World Whistlers Champion : ओठाची हालचाल न करता कंठातून शिट्टी वाजवणारा अवलिया

विद्यार्थी, मुली आणि आशा सेविका महिलांसाठी विशेष योजना

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळेत शिकणाऱ्या पाचवीमधील 60 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळविणारे मार्क मिळवतील, त्यांना सायकल बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक मुलगी किंवा दोन मुलीवर ऑपरेशन करणाऱ्या कुटुंबतील मुलींच्या नावे 10 हजार रुपयांची ठेव, तसेच कोव्हिड आणि महापुराच्या काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या आशा सेविकांना सायकल भेट देण्यात येणार आहे. मिरजमध्ये एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेचे उत्पन्न वाढीच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे मुद्दे या आर्थिक संकल्प मांडण्यात आल्याचे स्थायी समितीचे सभापती निरंजन आवटी यांनी सांगितले.

हेही वाचा-People Beat Teacher : कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात गैरसमजुतीतून शिक्षकाला चोप दिल्याचा Video Viral

Last Updated : Mar 30, 2022, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.