ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या फसव्या आश्वासनानंतर 64 दुष्काळग्रस्त गावांचा निवडणुकीवर बहिष्कार - अध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज जत बातमी

पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील 64 गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या सिंचन योजनेसाठी पाणी देता येत नसल्याचा खुलासा जलसंपदा विभागाने केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज जत तालुक्यातल्या गुड्डापुर येथे तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचा शेतकरी मेळावा पार पडला. पाणी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या शासना विरोधात येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत सरकार या 64 गावांना पाणी देण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फसव्या आश्वासनानंतर 64 दुष्काळग्रस्त गावांचा निवडणूकीवर बहिष्कार
author img

By

Published : Sep 15, 2019, 8:27 PM IST

सांगली - पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील 64 गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या सिंचन योजनेसाठी पाणी देता येत नसल्याचा खुलासा जलसंपदा विभागाने केला आहे. यानंतर, संतप्त दुष्काळग्रस्तांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही या गावातील नागरीकांनी केली आहे. गुड्डापूर येथील तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात गावांनी हा निर्णय घेतला आहे.

सांगली जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे. तालुक्याचा पूर्वभाग अद्यापही पाण्यापासून वंचित आहे. ही 64 गावे आजही पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेत या गावांचा समावेश करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विद्यमान खासदार संजय पाटील यांनी 64 गावांच्या पाण्यासाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला खुद्द मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जतमध्ये येऊन तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यामुळे जत तालुक्याच्या माथ्याचा दुष्काळीपाणी मिटेल अशी अपेक्षा बळावली होती.

मुख्यमंत्र्यांच्या फसव्या आश्वासनानंतर 64 दुष्काळग्रस्त गावांचा निवडणूकीवर बहिष्कार

हेही वाचा - महापूर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची केंद्रासह महाराष्ट्र व कर्नाटक शासनाला नोटीस

वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज यांनी जत ते मुंबई अशी पायी दिंडी काढली होती. यात त्यांनी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. राज्याच्या जलसंपदा विभागांना आता तुकाराम महाराज यांनी केलेल्या मागण्यांना खुलासा देणारे पत्र पाठवले आहे. या पत्रांमध्ये म्हैसाळ योजनेतून वंचित असणाऱ्या 64 गावांना पाणी देणे लवादाच्या निर्णयानुसार अशक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजूर केलेली योजना केवळ दिशाभूल करणारी होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - सांगलीत आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या सक्षमीकरणासाठी केली मेगा भरती

या सर्व पार्श्वभूमीवर आज जत तालुक्यातल्या गुड्डापुर येथे तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांचा शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शासनाच्या या दुटप्पीपणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पाणी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या शासना विरोधात येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत सरकार या 64 गावांना पाणी देण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला आहे.

Intro:
File name - mh_sng_01_paani_issue_on_election_vis_01_7203751 - to -
mh_sng_01_paani_issue_on_election_byt_07_7203751

स्लग - मुख्यमंत्र्यांच्या फसव्या योजनेच्या खुलास्यानंतर संतप्त 64 दुष्काळग्रस्त गावांचा निवडणूकीवर बहिष्काराचा निर्णय...

अँकर - पाण्यापासून वंचित असणाऱ्या जत तालुक्यातील 64 गावांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या सिंचन योजनेसाठी पाणीचं देता येत नसल्याचा खुलासा झाल्याने संतप्त दुष्काळग्रस्तांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत,कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी केली आहे.गुड्डापूर येथील शेतकरी मेळाव्यात तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात 64 दुष्काळग्रस्त गावांनी हा निर्णय घेतला आहे.Body:सांगली जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे.तर तालुक्यातला पूर्वभाग अद्यापि पाण्यापासून वंचित आहे.64 गावं आजही पाण्यासाठी वणवण भटकत आहेत,तर तालुक्याला वरदान असणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेत या गावांचा समावेश करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी 64 गावांच्या पाण्यासाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना प्रस्तावित केली होती.तर या योजनेला खुद्द मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जतमध्ये येऊन तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यामुळे जत तालुक्याच्या माथ्याचा दुष्काळीपाणी मिळेल अशी अपेक्षा बळावली होती वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी जत तालुक्यातील अध्यात्मिक गुरु तुकाराम महाराज यांनी जत ते मुंबई अशी पायी दिंडी काढली होती आणि विविध मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या, लोकसहभागातून दुष्काळी 64 गावांना सिंचन योजनेचे पाणी देण्यासाठी परवानगीची मागणी करण्यात आली होती.किंवा मंजूर करण्यात आलेली योजना तातडीने सुरू करावी,अशी मागणी करण्यात आली होती,परंतु राज्याच्या जलसंपदा विभागाकडून तुकाराम महाराज यांनी केलेल्या मागण्यांना खुलासा देणारे पत्र पाठवले असून आणि या पत्रांमध्ये स्पष्टपणे म्हैैैसाळ योजनेतून वंचित असणाऱ्या 64 गावांना पाणी देणे लवादाच्या निर्णयानुसार अशक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले,त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजूर केलेली योजना केवळ दिशाभूल करणारी होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आज जत तालुक्यातल्या गुड्डापुर येथे तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली पाण्यापासून वंचित असणाऱ्या 64 दुष्काळग्रस्त गावांचा शेतकरी मेळावा पार पडला.या मेळाव्यामध्ये शासनाच्या या दुटप्पी थोडासा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला,आणि पाणी देण्याच्या जाहीर आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या शासना विरोधात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच जो पर्यंत हे सरकार या 64 गावांना पाणी देण्यासाठी निर्णय घेत नाही,तोपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला आहे.तसेच सरकारने पाणी देण्यासाठी निर्णय घ्यावा किंवा शेजारी असणाऱ्या कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी,अशी मागणीही केली आहे.

बाईट - तुकाराम महाराज - बागडे महाराज शिष्य,जत.

बाईट - चंद्रशेखर पुजारी - सरपंच - गुडडापूर ,जत,सांगली.

बाईट - भिमाशंकर बिराजदार - दुष्काळग्रस्त, जत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.