ETV Bharat / state

भरकटलेले जहाज सुखरुप पोहोचले मिऱ्या बंदरात, 13 खलाशी सुखरूप - जहाज मिऱ्या बंदरावर सुखरुप बातमी

भगवती किनाऱ्याजवळ नांगर टाकून थांबलेले एक जहाज नांगर तुटल्याने खवळेल्या समुद्रात भरकटले होते. ते सुखरुपपणे मिऱ्या बंदरात पोहोचले आहे.

बंदाऱ्यावर पोहोचलेले जहाज
बंदाऱ्यावर पोहोचलेले जहाज
author img

By

Published : Jun 3, 2020, 1:48 PM IST

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर झाला आहे. वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात एक मालवाहू जहाज सापडले होते. आज (दि. 3 जून) सकाळी हे जहाज भगवती किनाऱ्यापासून लाटांच्या तडाख्यामुळे भरकटले होते. त्यानंतर हे जहाज मिऱ्या येथील पांढरा समुद्राजवळच्या धूप प्रतिबंधक बंदरावर सुरक्षित पोहोचले आहे. या जहाजेवर 13 खलाशी असून बचावकार्य सुरू आहे.

मिऱ्या बंदरावरील परिस्थितीचा आढावा घेताना प्रतिनिधी

वादळासोबत समुद्राला आलेल्या भरतीने किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू आहे. भगवती बंदर येथे एक जहाज नांगरून ठेवण्यात आले होते. मात्र, लाटांच्या तडाख्याने नांगर तुटल्याने हे जहाज भरकटले होते. ते सुखरुपपणे मिऱ्या बंदरात पोहोचले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी तसेच वित्त झाली नाही.

हेही वाचा - रत्नागिरीला निसर्ग वादळाचा फटका; झाडे कोसळली, घरांचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.