ETV Bharat / state

होळीची अनोखी प्रथा; पेटत्या होमातून बाहेर काढले जातात नारळ - शिरगाव

रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडी यागावात पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही कायम आहे.

होळीचा सण साजरा करताना नागरिक
author img

By

Published : Mar 21, 2019, 8:07 PM IST

Updated : Mar 21, 2019, 11:50 PM IST

रत्नागिरी - कोकणातील सर्वांत मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. होळी सणाला कोकणात पेटणाऱ्या होमांची वेगवेगळ्या प्रथा पहायला मिळतात. रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडीत अशीच पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही कायम आहे.

होळीचा सण साजरा करताना नागरिक

शिरगावात पोर्णिमेच्या नंतर दुपारी होम पेटतो. मात्र, यासाठी गावातून चिवे म्हणजे बांबूची होळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गावाच्या एका शेतात आणली जाते. होळी उभी करण्यासाठी जमिनीत कुठला खड्डा काढला जात नाही. तर गवताच्या भाऱ्या आणि पालापाचोळा आजूबाजूला पसरवून होळीचा होम केला जातो. होम पेटल्यानंतर त्यात गावातील प्रत्येक घरटी एक माणूस नवसाचा नारळ टाकतो. गेली अनेक वर्षे ही परंपरा येथे कायम आहे.

होम पेटल्यानंतर गावकरी पेटत्या होमातून नारळ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. गावातील तरुण आणि बालगोपाळ ही थरारक प्रथा फक्त होळी सणाला जोपासतात. कुणी १ नारळ तर कुणी ३ नारळ या पेटत्या होमातून सहज बाहेर काढतो. पेटत्या होमाच्या १० ते २० फुटांपर्यत या होमाची झळ लागत असते. मात्र, अशा परिस्थितीत होळी सणातील पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही या गावात सुरू आहे. हा थरार पाहण्यासाठी अनेक माहेरवाशीण आणि चाकरमानी गावात हजेरी लावत असतात.

Intro:पेटत्या होमातून नारळ काढण्याची प्रथा आजही कायम

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणातील सर्वांत मोठा श्रद्धेचा आणि परंपरेचा सण म्हणून शिमगोत्सवाकडे पाहिले जाते. कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. त्या आजही मोठ्या भक्तिभावाने जपल्या जातात. होळी सणाला कोकणात पेटणाऱ्या होमांची सुद्धा वेगळ्या प्रथा पहायला मिळतात. रत्नागिरी जवळच्या शिरगाव शिवरेवाडीत अशीच होमाची वेगळी आणि अंगावर शहारे आणणारी परंपरा पहायला मिळते.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. अशीच एक वेगळी प्रथा रत्नागिरी जवळच्या शिरगाव गावात पहायला मिळते. गावात पोर्णिमेच्या नंतर दुपारी होम पेटतो. मात्र यासाठी गावातून चिवे म्हणजे बांबूची होळी आणली जाते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावच्या एका शेतात हि होळी आणली जाते. होळी उभी करण्यासाठी जमिनीत कुठला खड्डा काढला जात नाही. तर गवताच्या भा-या आणि पालापाचोळा आजूबाजूला पसरवून होळीचा होम केला जातो. आणि होम पेटताच या पेटत्या होमात गावातील प्रत्येक घरटी एक नारळ या होमात नवसाचा म्हणुन टाकला जातो. शेकडो नारळ काही सेकंदात या होमात पडतात. गेले कित्येक वर्षाची हि परंपरा इथ पहायला मिळते.

होमचा आगडोम उठल्यानंतर खरा थरार सुरु होतो. गावकऱ्यांनी शेकडोंनी टाकलेले नारळ या पेटत्या होमातून काढण्याची कसरत सुरु होते. गावातील तरुण आणि बालगोपाळ ही थरारक प्रथा फक्त या होळी सणाला जोपासतात. कुणी एक नारळ तर कुणी तीन नारळ या पेटत्या होमातून सहज लिलया बाहेर काढतो. पेटत्या होमाच्या दहा फुट काय वीस फुटांपर्यत या होमाची झळ लागत असते. मात्र अशा परिस्थितीत होळी सणातील पेटत्या होमातून नारळ काढण्याची परंपरा आजही या गावात जोपासली जाते. हा थरार पाहण्यासाठी अनेक माहेवाशीणी आणि चाकरमानी गावात हजेरी लावत असतात. पेटत्या होमातून नारळ काढणे म्हणजे जिकरीचं..पण हि शिमग्यातली प्रथा म्हणुन या ठिकाणी पहायला मिळते. परंपरा जपण्याचं इथली मंडळी आजही हि अनोखी प्रथा कायम ठेवत कोकणातल्या संस्कृतीचं जतन होळीत करताना पहायला मिळतात.

Byte--- ग्रामस्थBody:पेटत्या होमातून नारळ काढण्याची प्रथा आजही कायमConclusion:पेटत्या होमातून नारळ काढण्याची प्रथा आजही कायम
Last Updated : Mar 21, 2019, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.