रत्नागिरी - निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवार मतदारांपर्यंत पोहण्यासाठी लोक काय शक्कल वापरतील, याचा काही नेम नाही. रत्नागिरीत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत देखील असाच काहीसा अनुभव आला आहे. नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून मिलिंद कीर उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लग्न पत्रिकेप्रमाणे प्रचार पत्रिका छापून शहरात प्रचार सुरू केला आहे.
हेही वाचा... महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी
उमेदवाराचा प्रचार'पत्रिका' वाटून हटके प्रचार
'रविवार २९ डिसेंबर २०१९ रोजी मिलिंद कृष्णकांत कीर यांचा शुभविजय करण्याचे योजिले आहे.. तरी मंगल प्रसंगी एक नंबरचे अर्थात घड्याळासमोरचे बटण दाबून साहेबांना विजयासाठी शुभाशीवार्द द्यावेत...' अशा प्रकारची प्रचार पत्रिका वाटप करत कीर यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. प्रचार करण्याची ही पद्धत नक्कीच अनोखी आहे. राष्ट्रवादीकडून मिलिंद कीर हे सध्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्या सोशल मीडिया ग्रुपकडून व्हायरल होणारी ही प्रचार पत्रिका सध्या चांगलाच भाव खावून जात आहे.
हेही वाचा... 'शरद पवारांच्या महाराष्ट्रातील लढ्याकडून मिळाली प्रेरणा'
मिलिंद किर यांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया संभाळणारा एक ग्रुप आहे. त्यांच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख श्रीकांत भट यांनी ही पत्रिका तयार केली आहे. त्यांनी लग्नपत्रिकेप्रमाणे वाटणारी ही प्रचार पत्रिका छापून घेतली आहे. यात उमेदवाराचा प्रचार आहेच, पण मतदारांसाठी मतदानाला सुद्धा प्रवृत्त केले गेले आहे. कमी वेळेत अधिक लोकांपर्यत पोहोचण्यासाठी प्रचार पत्रिकेचे हे माध्यम मतदारांना देखील चांगलेच आवडलेले दिसत आहे.
हेही वाचा... 'एनआरसी', 'सीएए' कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान उतरणार रस्त्यावर - संभाजी भिडे