रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभर जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी सर्व देशवासियांनी केले आहे. यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून तीन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधी अधिक माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आलीय. त्यामध्ये 50104/50103 रत्नागिरी दादर रत्नागिरी पॅसेंजर, 50106/50108 मडगाव-सावंतवाडी-दिवा-सिंधुदुर्ग पॅसेंजर, 50101/50102 मडगाव-रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.