ETV Bharat / state

उद्यापासून पर्ससीन मासेमारीला सुरुवात, खलाशांची वाणवा - रत्नागिरी जिल्हा बातमी

पर्ससीन नेटद्वारे मासेमारीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र, कोरोना व टाळेबंदीमुळे खलाशांअभावी नौका सध्या बंदरातच उभ्या आहेत. सरकरने याकडे लक्ष देत मदात करावी, असी मागणी मच्छिमार करत आहेत.

ratnagiri
बंदरात थांबलेल्या बोटी
author img

By

Published : Aug 31, 2020, 3:41 PM IST

Updated : Aug 31, 2020, 5:19 PM IST

रत्नागिरी - पर्ससीन नेटद्वारे मासेमारीला उद्यापासून (1 सप्टे.) सुरुवात होणार आहे. मात्र, ही मच्छिमारी सुरु होण्याआधीच पर्ससीननेटधारक मच्छिमार अडचणीत सापडला आहे. कारण, सध्या बोटींवर खलाशांची वाणवा असलेली पाहायला मिळत आहे. टाळीबंदीमुळे खलाशांच्या आगमनावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे खलाशांअभावी नौका सध्या बंदरातच उभ्या आहेत.

बोलताना मच्छिमार

शासनाच्या आदेशानुसार 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट मच्छीमारीला सुरुवात होणार आहे. मागील हंगामात अखेरच्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे गणित कोलमडले होते. काही काळ मासेमारी बंद ठेवण्यात आली होती. त्याचा आर्थिक भुर्दंड मच्छीमारांना बसला होता. यंदा सुरुवातीलाच खलाशांना आणण्यासाठी ई-पास काढण्यापासून त्यांना क्वारंटाईन करुन ठेवण्यापर्यंत सर्व गोष्टी मच्छीमारांना कराव्या लागत आहेत. काही जण ठाणे, पालघर येथून खलाशी आणून ठेवले आहेत. कर्नाटक, ओरीसा, बिहार या राज्यातून येणार्‍यांसाठी खटपट सुरु आहे. या गडबडीत 25 ते 30 टक्केच पर्ससिननेट नौका समुद्रावर स्वार होतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात परवानाधारक पर्ससिननेट नौकांची संख्या सुमारे पावणेतीनशे इतकी आहे. रत्नागिरी, राजापूर तालुक्यातच या नौका आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही मासेमारी सुरु होणार आहे. कर्नाटक बरोबरच नेपाळमधील अनेकजण बोटींवर काम करण्यासाठी गेल्या काही वर्षात कोकणात येत आहेत. कोरोनामुळे नेपाळमधून भारतात येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक नेपाळी येऊ शकले नसल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी अन्य राज्यातील किंवा ठाणे, पालघर येथील लोकांचा पर्याय मच्छीमारांना अवलंबावा लागणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल, असे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. एका बोटीवर 25 ते 30 खलाशी काम करतात. जिल्ह्यात खलाशी म्हणून काम करण्यासाठी सुमारे 8 ते 9 हजार जण मासेमारी हंगामात येतात. महिन्याचा एका खलाशाचा खर्च किमान दहा हजार रुपये इतका आहे. दरम्यान, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला अनेक संकटे समोर असल्याने सरकारने मदत करावी, अशी मागणी पर्सेसीन मच्छिमारांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा - कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

Last Updated : Aug 31, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.