ETV Bharat / state

मजुरांना नेपाळला घेऊन जाणारी बस भोस्ते घाटात उलटली; चालक फरार - bhoste ghat accidents

मजुरांना घेऊन नेपाळसाठी निघालेल्या खासगी आरामबसचा खेड नजीकच्या भोस्ते घाटात अपघात झाला आहे. एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने संबंधित बस उलटली. या अपघातानंतर प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. तर, सध्या चालक घटनास्थळावरून फरार झालाय.

bhoste ghat accidents
मजुरांना नेपाळला घेऊन जाणारी बस भोस्ते घाटात उलटली; चालक फरार
author img

By

Published : Jun 1, 2020, 3:25 PM IST

रत्नागिरी - मजुरांना घेऊन नेपाळसाठी निघालेल्या खासगी आरामबसचा खेड नजीकच्या भोस्ते घाटात अपघात झाला आहे. एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने संबंधित बस उलटली. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीय.

मजुरांना नेपाळला घेऊन जाणारी बस भोस्ते घाटात उलटली; चालक फरार

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी मजुरांना घेऊन रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतून एक खासगी बस निघाली. यामध्ये ४० प्रवासी होते. ही बस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भोस्ते घाट उतरत होती. मात्र, एका अवघड वळणार आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले; आणि बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून उलटली. मात्र, या अपघातानंतर प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. तर, सध्या चालक घटनास्थळावरून फरार झालाय.

संबंधित अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर संबंधित मालकाशी संपर्क करून दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्व प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यानंतर दुसऱ्या गाडीने सर्व मजुरांना पाठवण्यात आले.
दरम्यान ज्या वळणावर हा अपघात झाला, त्याच वळणावर मागील महिनाभरात सहा अपघात झाले आहेत. महामार्ग चौपदरीकरणादरम्यान तयार करण्यात आलेले हे वळण अतिशय धोकादायक असल्याने त्याच ठिकाणी वारंवार अपघात झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सावर्जनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.