रत्नागिरी - सातारा येथे पार पडलेल्या शालेय विभागाच्या जलतरण स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या ३ जलतरणपटूंनी घवघवीत यश मिळविले. करण मिलके, तनया मिलके आणि श्रावणी खटावकर अशी यश मिळवलेल्या जलतरणपटूची नावे असून या तीनही खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच निवड झाली आहे.
सातारा येथे १९ आणि २० सप्टेंबरला शालेय जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत करण महेश मिलके याने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक आणि ५० मीटर फ्री स्टाइल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.
तनया महेश मिलके हिने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तर श्रावणी स्वप्नील खटावकर हिने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, या तीनही खेळाडूंचे रत्नागिरी जिल्ह्यातून कौतूक होत आहे.
हेही वाचा - मराठमोळ्या 'स्मृती'चा विक्रम; विराट, रोहित, धोनीसारखे दिग्गजही करू शकले नाहीत 'असा' विक्रम
हेही वाचा - परदेशात 'हिरो' ठरलेला जसप्रीत बुमराह 'या'बाबतीत मायदेशात आहे 'झिरो'