ETV Bharat / state

रत्नागिरीत 12 हजार बाधित रूग्ण , 145 कंटेनमेंट झोन - Ratnagiri latest news

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 12 हजार 20 झाली आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या 388 असून मृत्यूदर 3.23 आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी
author img

By

Published : Apr 10, 2021, 8:59 PM IST

रत्नागिरी - वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पूर्णतः लॉकडाऊन आहे. जनतेनेही या लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 12 हजार 20 झाली आहे. मृत 388 असून मृत्यूदर 3.23 आहे. जिल्ह्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 789, होम क्वारंटाइन 568 तर होम आयसेलेशनमध्ये 349 रुग्ण आहेत. 52 रुग्ण ऑक्सिजनवर तर 6 व्हेंटिलेटरवर आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेल्यांची संख्या 1 लाख 30 हजार 571 असून 145 कंटेनमेंट झोन आहेत.

जिल्ह्यात कोरोनारुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात 2 हजार 628 बेड वाढवण्यात आले आहेत. यामध्ये 2 हजार 16 विनाऑक्सिजन, 617 ऑक्सिजन बेड, 116 आयसीयू बेड तर 138 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रेमडेसिवीर औषधाचा साठाही दहा ते बारा दिवस पुरेल एवढा आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सेवा बंद आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.