ETV Bharat / state

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 300 पोती भाताची मदत; रत्नागिरीतील अनोखा उपक्रम - बासुरी फाऊंडेशन-ॲलिकॉन

'क्यार' चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अशा अस्मानी संकटात कोकणातला शेतकरी भरडला गेला. कोकणात भात हे मुख्य पीक आहे. पण अनेक ठिकाणी हे पीक पावसामुळे सडले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर केली गेली. मात्र, ती अजून मिळाली नाही. त्यामुळे शेकऱ्यांच्या मदतीसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

rice-giving-to-the-wet-drought-affected-farmers-in-ratnagiri
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 300 मण तांदळाची मदत
author img

By

Published : Dec 11, 2019, 9:35 AM IST

Updated : Dec 11, 2019, 11:19 AM IST

रत्नागिरी- कोकणातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन भातशेती आहे. मात्र, चक्रीवादळाच्या प्रभावाने आणि निसर्गाच्या कोपाने कोकणातल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले. सरकारी पंचनामे रंगवले गेले, मदतीसाठी पॅकेज सुद्धा घोषित झाले. परंतु, आजही कोकणातला शेतकरी सरकारी मदतीशिवाय वंचित आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनोखी मदत करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तीन गावातील ८० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ३०० मण (साधारणत: 300 पोती) तांदळाच्या स्वरुपात थेट भरपाई दिली गेली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 300 मण तांदळाची मदत

हेही वाचा- शेतकरी, शेतमजूरसह महिलांच्या विविध प्रश्‍नांसाठी आझाद मैदान येथे आंदोलन

'क्यार' चक्रीवादळाचा तडाखा, अवकाळी पाऊस, अशा आस्मानी संकटात कोकणातला शेतकरी भरडला गेला. कोकणात भात (तांदुळ) हे मुख्य पीक आहे. पण अनेक ठिकाणी हे पीक पावसामुळे सडले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर केली गेली. मात्र, ती अजून मिळाली नाही. त्यामुळे शेकऱ्यांच्या मदतीसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी, धामणी आणि चिखली गावातील ५० टक्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यातील बासुरी फाऊंडेशन-ॲलिकॉन आणि राजवाडीतील पीपल्स एम्पावरिंग मुव्हमेंट (पेम) ही संस्था मदतीसाठी पुढे आली. भाताचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून चढ्या दराने भात विकत घ्यावे लागणार होते. ही समस्या लक्षात घेऊन या दोन संस्थांनी शेतकऱ्यांना भाताच्या स्वरूपात थेट भरपाई देण्याची अभिनव योजना आखली.

ही योजना तयार करण्यापूर्वी पेमसंस्थेतर्फे तीन गावात सर्वेक्षण करण्यात आले. सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत ज्या शेतकऱ्यांचे यंदा सुमारे चाळीस ते पन्नास टक्के नुकसान झाले. त्यांना मदत देण्यात आली. विशेष म्हणजे जे दुबार शेती करतात त्यांनाच ही मदत दिली गेली. सरकारी मदतीची वाट न पाहता आणि पैशाची मतद न करता नुकसान झालेल्या भाताची नुकसान भरपाई आज ८० शेतकऱ्यांना दिली गेली. संतोष भडवळकर आणि विलास गोवले या दोन शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले होते त्यांना ही मदत करण्यात आली आहे.

Intro:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी करण्यात आली अनोखी मदत

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन म्हणजे भात शेती. पण चक्रीवादळाच्या प्रभावानं आणि निसर्गाच्या कोपानं कोकणातल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळलं. सरकारी पंचनामे रंगवले गेले, मदतीसाठी पॅकेज सुद्धा घोषित झाले पण आजही कोकणातला शेतकरी सरकारी मदतीशिवाय पोरता आहे. पण याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनोखी मदत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तीन गावातील ८० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ३०० मण भाताच्या स्वरुपात थेट भरपाई दिली गेली. सरकारी तुटपुंजीमदतीची वाट न पाहता कशी कुणी केली हि मदत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

व्हिओ-2- क्यार चक्रीवादळाचा तड़ाखा, अवकाळी पाऊस अशा आस्मानी संकटात कोकणातला शेतकरी पिचलाय. शेतात मोत्याचा दाणा काढण्याची वेळ जवळ आली होती आणि होत्याचं नव्हतं झालं. निसर्गानं पार चोळामोळा करून टाकला कोकणातल्या शेतपिकाचा. कोकणातलं भात हे मुख्य पिक. पण अनेक ठिकाणी हे पिकं पावसामुळे सडलं आणि कोकणातल्या शेतकऱ्याच्या डोळ्याच्या पापाण्या पाणावून गेला. नुकसान भरपाईच्या नावाखाली आकडे रंगवले गेले. तुटपुंजी मदत अद्याप मिळालेली नाही. पण या पोशींद्यांंचं मनोबल वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात राबवण्यात आला. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी, धामणी आणि चिखली गावातील ५० टक्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्याची बासुरी फौंडेशन-ॲलिकॉन आणि राजवाडीतील पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम) हि संस्था मदतीसाठी पुढे आली. भाताचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या शेतक-यांना खुल्या बाजारातून चढ्या दराने भात विकत घ्यावे लागणार होते. ही समस्या लक्षात घेऊन या दोन संस्थांनी शेतक-यांना भाताच्या स्वरूपात थेट भरपाई देण्याची अभिनव योजना आखली.
बाईट-१- सतिश कामत.पेम संस्था प्रमुख
व्हिओ-२- ही योजना तयार करण्यापूर्वी पेमसंस्थेतर्फे तीन गावात सर्वेक्षण करण्यात आले.सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत ज्या शेतक-यांचे यंदा सुमारे चाळीस ते पन्नास टक्के नुकसान झाले, अशानाच मदत देण्यात आली. विशेष म्हणजे जे दुबार शेती करतात अशांनाच हि मदत दिली गेली.सरकारी मदतीची वाट न पाहता आणि पैशाची मतद न करता नुकसान झालेल्या भाताची नुकसान भरपाई आज ८० शेतकऱ्यांना दिली गेली. खरंचं गरज असलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत पोहचण्यापुर्वी हि मदत केली गेलीय. संतोष भडवळकर आणि विलास गोवले हे दोन शेतकरी...संतोषकडे ६० गुठे भात शेती, त्याच ६० मण म्हणजे १८ क्विंटल भात पिकायचे. पण यावर्षी जेमतेम २० मण उत्पादन मिळालंय. तर विलासच्याकडे ५० गुठे भात शेतीची जमिन होती. त्याच ४० मण भात पिकायचे. पण आज परिस्थिती अशी आहे कि घरात खायला त्यांना बाजारातून तांदूळ विकत घ्यावे लागणार होते. मात्र आज नुकसान झालेल्या भाताच्या निम्मे भात मदत म्हणुन मिळाल्याने या शेतकऱ्यांनी अनोख्या मदतीचा हात मिळाला आहे.

बाईट-2-- संतोष भुडवळकर. शेतकरी

व्हिओ-३- निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी कोलमडलाय. आज सरकारकडून त्याला मदतीची अपेक्षा आहे. पण या तीन गावातल्या ८० शेतकऱ्यांना हि अनोखी मदत देवून त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या पोशिद्यांला हि मदत नक्कीच नवी उभारी देवून जाणार आहे.
Body:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी करण्यात आली अनोखी मदत
Conclusion:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी करण्यात आली अनोखी मदत
Last Updated : Dec 11, 2019, 11:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.