ETV Bharat / state

दिलासादायक... संगमेश्वरमधील 'त्या' पाच गावांमधील कंटेंटमेंट झोन उठला

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण गेल्या चौदा दिवसांपासून धामणी, नावडी, माभळे, कसबा आणि कोंडगाव कंन्टेंटमेंट झोनमध्ये होते. मात्र आता परिस्थिती आवाक्यात आली आहे, रुग्णही बरे झाले आहेत, त्यामुळे हा कंटेंटमेंट झोन उठविण्यात आला आहे.

ी
author img

By

Published : Jun 28, 2021, 9:07 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण गेल्या चौदा दिवसांपासून धामणी, नावडी, माभळे, कसबा आणि कोंडगाव कंन्टेंटमेंट झोनमध्ये होते. मात्र आता परिस्थिती आवाक्यात आली आहे, रुग्णही बरे झाले आहेत, त्यामुळे हा कंटेंटमेंट झोन उठविण्यात आला असल्याचे प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे. मात्र ओझरखोल आणि कोसुंब ( रेवाळेवाडी) या दोन गावात कंन्टेंटमेंट झोन कायम असणार आहे.

'त्या' पाच गावांना दिलासा -

संगमेश्वर तालुक्यातील धामणी, नावडी, माभळे, कसबा , कोंडगांव या परिसरामध्ये कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याने व सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होवू नये म्हणून या परिसरामधील क्षेत्र Containment Zone ( कोरोना विषाणू बाधित क्षेत्र ) म्हणून घोषित केले होते. तेथील नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्यास तसेच बाहेरुन येणाऱ्या लोकांना बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश देण्यात आला होता.

दरम्यान मौजे धामणी, नावडी , माभळे , कसबा , कोंडगांव या संपूर्ण गावांमधील लोकांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोरोनाबाधीत रुग्णांचे अलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ही गावे बाधित क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नयेत, असा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला होता. त्यामुळे खात्री करून उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी या भागातील कंटेंटमेंट झोन उठवण्यात आला असल्याचे आदेश जारी केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.