रत्नागिरी - हजरत निजामुद्दीन - मडगाव राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसला शनिवारी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास करबुडे बोगद्यात अपघात झाला. दरड कोसळून रुळावर दगड पडल्याने आज पहाटे ही घटना घडली. मात्र सुदैवाने डबे रुळावरून बाहेर गेले नाहीत. त्यामुळे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामामुळे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या हा दगड हटविण्याचे काम कोकण रेल्वेकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
हजरत निजामुद्दीन - मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडी रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये आज पहाटे 4.15 वाजता अचानक एक मोठा दगड मार्गावर कोसळल्याने हा अपघात झाला. दगड मधे आल्यामुळे रेल्वेचं इंजिन रूळावर घसरले आहे. सध्या देखभाल दुरुस्ती आणि वैद्यकीय उपचार गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. रेल्वे अधिकारी दुरुस्ती पथकासह दगड हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे. मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्टेशन वर थांबवण्यात आल्या आहेत. राजधानी एक्सप्रेसमध्ये एकूण 265 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवाशी सुखरुप असून रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू होण्यास अजून 4 ते 5 तास लागणार असल्याचे सांगण्यात येत होते.
राजधानी एक्सप्रेस मार्गावर; रत्नागिरीकडे रवाना-
घसरलेले रेल्वे इंजिन पुन्हा रुळावर आणण्यास रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.सुरवातीला डबे बाजूला करण्यात आले.त्यानंतर रेल्वे रुळावर घसरलेले राजधानी एक्सप्रेसचे इंजिन रुळावर आणून ही रेल्वे तब्बल ६ तासानंतर मार्गस्थ झाली आहे. राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीच्या दिशेने रवाना करण्यात आली. कोकण रेल्वेचे अधिकारी अभियंते आणि कामगारांनी अत्यंत कमी वेळात केली महत्वपूर्ण कामगिरी