ETV Bharat / state

बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है...रत्नागिरी पोलिसांकडून शायरीच्या माध्यमातून जनजागृती - ratnagiri police appeals people to stay in homes

लॉकडाऊनचे पालन करत नागरिकांनी घरी बसावे, यासाठी रत्नागिरी पोलीस शायरीच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. रत्नागिरीतील कोरोना रुग्णांची संख्या 5 वर गेलीय तर जिल्ह्यातील पहिला रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

ratnagiri-police-appeals-people-to-stay-in-homes
बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है...रत्नागिरी पोलिसांकडून शायरीच्या माध्यमातून जनजागृती
author img

By

Published : Apr 13, 2020, 8:19 AM IST

Updated : Apr 13, 2020, 11:10 AM IST

रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच राहावे असे आवाहन रत्नागिरी पोलीस करत आहेत. कधी गाण्यातून तर कधी बँडच्या माध्यमातून तर विनाकारण रस्त्यावर आलेल्या नागरिकांना अगदी हात जोडूनही घरी राहण्याचे महत्त्व समजवून सांगितले होते. सध्या रत्नागिरी पोलिसांचा असाच एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओमध्ये ते शायरीच्या माध्यमातून घरी रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन नागरिकांना करताना दिसत आहेत.

बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है...रत्नागिरी पोलिसांकडून शायरीच्या माध्यमातून जनजागृती

‘बेवजह घरसे निकलनेकी जरूरत क्या है, मौत से आँख मिलानेकी जरूरत क्या है, सबको मालूम है बाहर की हवा है कातिल, युंही कातिल से उलझने की जरूरत क्या है’…. या शायरीच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा, साखरतर, उद्यमनगर यासह इतर भागात लोकांनी घरीच थांबून कोरोनाला हरवावे, यासाठी या शायरीच्या माध्यमातून पोलीस जनजागृती करतायत.

रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या 5 वर गेली आहे. गुहागरमधील शृंगारतळी येथे पहिला रुग्ण सापडला. यानंतर राजीवडा येथे एक तर साखरतरमध्ये 2 रुग्ण सापडले. खेडमधील कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शृंगारतळीतील पहिल्या कोरोना रुग्णाचे उपचारानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. तीन रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Last Updated : Apr 13, 2020, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.