रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असलेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीनेही या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रवादीने या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. पत्रकार परिषद घेत नाणार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेच्या आडमुठेपणामुळे खो बसतोय, असा आरोपदेखील रत्नागिरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच नाणार रिफायनरी समर्थकांकडून राष्ट्रवादीला निमंत्रण आल्यास नक्की समर्थनाला जाऊ, अशी भूमिका राष्ट्रवादीने स्पष्ट केली आहे. तर, नाणार रिफायनरी विरोधावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना राष्ट्रवादीने टोला लगावला आहे.
स्वतःच्या मतदारसंघात रोजगार आणू न शकलेले आता दुसऱ्यांच्या मतदारसंघात लुडबूड कशाला करता? असा थेट सवाल करत स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना टोला लगावला.
हेही वाचा -
नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोलीचा डीव्हीसीएम विलास कोल्हाचे एके-४७ सह पोलिसांसमोर आत्मसमर्पण
राज्यातील डॉक्टरांना आता लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे नियम लागू होणार
राहुल, सोनिया गांधींसह ८ जणांवर चिथावणीखोर भाषण प्रकरणी गुन्हा दाखल करा