ETV Bharat / state

भास्कर जाधवही 'शिव'बंधनात, १३ सप्टेंबरला करणार पक्षप्रवेश - Bhaskar jadhav joined shivsena

आपण पक्ष सोडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिखित स्वरूपात आपल्या भावना कळवल्या आहेत. तसेच तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी जर संधी दिली तर गुहागर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव पत्रकार परिषदेत बोलताना
author img

By

Published : Sep 9, 2019, 4:23 PM IST

रत्नागिरी - गेले अनेक दिवस संभाव्य शिवसेना प्रवेशामुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव अखेर शिवबंधन हाती घेणार आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज (सोमवारी) प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिपळूणमध्ये त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

भास्कर जाधवही 'शिव'बंधनात, १३ सप्टेंबरला करणार पक्षप्रवेश

हेही वाचा - 'जल है तो कल है', जालन्यातील लोकमान्य गणेश मंडळाने साकराला देखावा

आपल्यासोबत 9 जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समिती तसेच आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, आणि सरपंच आपल्या सोबत प्रेवेश करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राष्ट्रवादीला सर्वात मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा - बाप्पांचा फोटो, 'गणेशा'सोबत 'सेल्फी' घेण्याची वाढली 'क्रेझ'

दरम्यान, आपण पक्ष सोडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिखित स्वरूपात आपल्या भावना कळवल्या आहेत. तसेच आपण राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराशी आपल्या सोबत शिवसेनेत येण्यासाठी संपर्क केला नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी जर संधी दिली तर गुहागर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

पत्रकार परिषदेत जाधव यांची घोषणा

रत्नागिरी, प्रतिनिधी

गेले अनेक दिवस संभाव्य शिवसेना प्रवेशामुळे चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव अखेर 13 सप्टेंबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिपळूणमध्ये त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं..
दरम्यान आपल्यासोबत 9 जिल्हा परिषद सदस्य, गुहागर पंचायत समिती तसेच आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, आणि सरपंच आपल्या सोबत प्रेवेश करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात राष्ट्रवादीला सर्वात मोठा फटका बसणार आहे.
दरम्यान आपण पक्ष सोडत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिखित स्वरूपात आपल्या भावना कळवल्या असून, आपण राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराशी आपल्या सोबत शिवसेनेत चला यासाठी संपर्क केला नसल्याचं यावेळी जाधव यांनी स्पष्ट केलं. याचसंदर्भात आमदार भास्कर जाधव यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी. Body:भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

पत्रकार परिषदेत जाधव यांची घोषणाConclusion:भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

पत्रकार परिषदेत जाधव यांची घोषणा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.