ETV Bharat / state

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार- मंत्री संजय शिरसाट - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

सुजय विखेंचा भक्ताचा कोणताही अनादर करण्याचा उद्देश नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय. शिर्डीत संजय शिरसाट पत्रकारांशी बोलत होते.

Minister Sanjay Shirsat
मंत्री संजय शिरसाट (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2025, 4:30 PM IST

अहिल्यानगर- महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज शिर्डीचा दौरा केलाय. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय. भिकारीमुक्त साई देवस्थान आणि मोफत भोजन व्यवस्था बंद या सुजय विखेंच्या वक्तव्याचा मी आज शिर्डी दौऱ्यावर असताना पूर्ण अर्थ समजून घेतलाय. काल मला पूर्ण वस्तुस्थिती माहीत नव्हती, तर मी त्यांच्या वक्तव्यास विरोध केला होता. मात्र आज त्याबाबत मी व्यवस्थित माहिती घेतली असून, सुजय विखेंचा भक्ताचा कोणताही अनादर करण्याचा उद्देश नसल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय. शिर्डीत संजय शिरसाट पत्रकारांशी बोलत होते.

विरोधक काय बोलतात याला महत्त्व नाही : विविध भागातून शिर्डीत बसने किंवा ट्रकने नशा करणारे येतात. त्यांना पायबंद घालावा, त्या वक्तव्यामागे असा उद्देश सुजय विखेंचा होता. भाविकांचा अनादर करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे आता या वादावर पडदा पडावा, अस मला वाटतंय, असेही संजय शिरसाट म्हणालेत. शिर्डी देवस्थानाचं प्रसादालय आहे, ते तसंच सुरू राहील आणि तिथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असंही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. विरोधक काय बोलतात याला महत्त्व नाही, वस्तुस्थिती काय असते हे समजून घेतलं पाहिजे. सुजय विखेंनी मला वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे विरोधाला विरोध करायचा नसतो. भूमिका समजून घेणं गरजेचं असल्याचंही मतही त्यांनी व्यक्त केलंय.

संजय राऊतांची भाषा मवाळ : संपूर्ण महाराष्ट्राने सकाळचा वाजणारा भोंगा पाहिला आहे. भोंग्यामुळे उबाठा गटाची वाट लावली आहे. त्या भोंग्याला आता सुबुद्धी आलेली आहे. मधल्या काळात त्यांनी कोणते औषध उपचार घेतले माहीत नाही. आता भाषा मवाळ झालीय. एकेकाळी ह्याच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारे आता त्यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणत आहेत, त्यांच्यात झालेला बदल त्यांच्यासाठी भरपूर असल्याचंही संजय शिरसाट म्हणालेत.

मुंडेंच्या राजीनाम्याची राज्यपालांकडे मागणी : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेच्या मागे-पुढे आणि पडद्यामागे आणखी जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्याप्रमाणे कारवाई सुरू झालीय. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मग धनंजय मुंडे यांचं नाव आलं तरी त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, असेही यावेळी संजय शिरसाट यांनी सांगितलंय.

हेही वाचा-

  1. संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'
  2. मनोज जरांगेंची चिथावणीखोर भाषा; ओबीसी नेते आक्रमक, लक्ष्मण हाकेंनी दिला 'हा' इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.