ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स अन् केटरर्स असोसिएशनचे एकदिवसीय धरणे आंदोलन

कोरोनाच्या काळात लग्न व इतर समारंभावर काही बंधने आल्याने मंडप, लाईट, साऊंड, इव्हेंट्स मॅनेजमेंट आणि केटरर्स यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने संघटनेने आंदोलन छेडले आहे.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Nov 2, 2020, 4:56 PM IST

रत्नागिरी - ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशन यांच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनने आज (दि. 2 नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे.

प्रतिनिधीने घेतलेला आंदोलनाचा आढावा
  • सरकारकडून दुर्लक्ष झाल्याने आंदोलन

कोरोना महामारीमुळे देश व देशांतर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक आडचणीला सामोरे जावे लागत आहे . त्याअंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, डि. जे., साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील असोसिएशनच्या माध्यमातून अनलॉक प्रक्रियेमध्ये हॉल, मंडप उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात अली होती. यासाठी विविध निवेदने सुद्धा सरकारकडे देण्यात आली. मात्र, त्यानंतरही शासनाकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने आज राज्यभरात मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स चालक मालक धरणे आंदोलन करत आहेत.

रत्नागिरीत सुद्धा रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन सुरू असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. सोशल डिस्टनसींगचे नियम पाळून हे आंदोलन सुरू आहे.

  • मग आम्हालाच परवानगी का नाही

सरकारने रेल्वे सुरू केल्या, जिम सुरू केल्या, बार सुरू केले आहेत, मग आम्हालाच जाचक अटी कशासाठी, आम्हाला परवानगी का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

  • या आहेत मागण्या
  1. सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप , लॉन , मंगल कार्यालय , हॉलच्या , क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांच्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी ५०० व्यक्तीच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी.
  2. टेन्ट, मंडप, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, लॉन्स, ईव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड लाईट डेकोरेशन आणि ईतर या व्यावसायाशी संबंधीत जी.एस.टी. 18 टक्क्यांऐवजी 5 % पर्यंत करावी.
  3. बऱ्याचशा व्यवसाय धारकांनी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम , बॅक्वेट हॉल , मंगल कार्यालय , भाड्याने घेतले आहेत. तेव्हा परिस्थीती सामान्य होई पर्यंत याचे भाडे घेऊ नये असे निर्देश व कायद्यात समाविष्ट करावे.
  4. कर्मचारी यांच्या पी.एफ.मध्ये सवलत व स्थिती सामान्य होईपर्यंत शासनाने याचे भुकतान करावे.
  5. मंडपामध्ये होणाऱ्या विवाह समारंभाच्यावर लागणरा जी.एस.टी. वधु पित्याला परत मिळण्याचे तरदुत करावी.
  6. कर्जधारकांचे व्याज माफ करावे व प्रत्येक ई.एम.आई. स्थिती सामन्य होईपर्यंत चालू करण्यात येऊ नयेत.
  7. मंडप व्यावसायधारकास उद्योगाचा दर्जा दिला जावा. ज्यामुळे त्याचा रोजगार व व्यवसाय चालवण्यासाठी बँकेकडून कर्ज सहज प्राप्त होऊ शकेल.
  8. कैटरिंग, इवेंट मॅनेजमेंट आणि या व्यावसायाशी संबंधित सर्व व्यावसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतुद करावी.
  9. मंगल कार्यालय , बॅक्वेट हॉल , लॉन्स् , कॅटरिंग, ईव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड लाईट डेकोरेशन आणि ईतर सबंधित व्यावसायीक या कोरोना महामारीच्या कार्यात अत्यावश्यक सेवेत राहणे गरजेचे आहे.
  10. सत्कार समारोह संबंधित सुक्ष्म व अतिसुक्ष्म व्यावसायिक यांच्या खात्यात मदत राशी जमा करावी, या व्यवसायाच्या अडचणी लक्षात घेऊन व वेगळ्या मदत पॅकेजची घोषणा करावी.
  11. मंडप, फर्निचर, लाईट, बैंड, बग्गी, फुल मंडप, बैक्वेट हॉल व या व्यावसायाशी संबंधित लावल्या जाण्याऱ्या सर्व करात सुट मिळावी.
  • अन्यथा तीव्र आंदोलन

मंडप, मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन्स, केटरिंग, ईव्हेंट मॅनेजमेंट, साऊंड लाईट डेकोरेशन आणि इतर व त्या संबंधी व्यवसाय धारकांच्या मागण्या संदर्भात सरकारने सहानुभूतीपर विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा - माझे कुटुंब माझी जबाबदारीमुळेच कोरोना रुग्णांच्या वाढीला अंकुश - महसूल राज्यमंत्री सत्तार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.