ETV Bharat / state

रत्नागिरीत मत मोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; शिवसेना गड राखणार की विरोधक मारणार बाजी? - maharashtra assembly election result 2019

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

रत्नागिरीत मत मोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
author img

By

Published : Oct 23, 2019, 4:56 PM IST

Updated : Oct 23, 2019, 5:27 PM IST

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

रत्नागिरीत मत मोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. तेथील आढावा देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाचही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबलावर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल आणि सर्व्हिस व्होटरच्या मत मोजणीचा एक राउंड होणार आहे. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. तर गुहागर आणि दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. हे पाचही विद्यमान आमदार यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे.

मात्र, गुहागर मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडून आलेले भास्कर जाधव यावेळी मात्र शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा शिवसेनेची ताकद वाढलेली दिसत आहे. परिणामी शिवसेनेच्या जागा वाढतात की, कमी होतात हे पाहाणे महत्त्वाचे असणार आहे.

यावेळी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघातून एकूण ३२ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६०.९६ टक्के मतदान झाले आहे. यावेळी एकूण १० लाख १३ हजार ५५५ मतदार होते. त्यापैकी ७ लाख ९८ हजार ८७९ मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनी नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे गुरुवारी निकालानंतरच स्पष्ट होईल. पण, चिपळूण आणि दापोली विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रत्नागिरीत कोण मारणार बाजी?

दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांचे आव्हान आहे. तर चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांची हॅटट्रिक राष्ट्रवादीचे शेखर निकम रोखणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी आणि प्रशासनाच्या मतमोजणी तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

हेही वाचा- बँकांच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी एकवटले, रत्नागिरीत संप

Intro:मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

शिवसेना गड राखणार की विरोधक मारणार बाजी, आज होणार स्पष्ट

रत्नागिरी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. गुरुवारी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाचही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी प्रत्येकी 14 टेबलावर मतमोजणी होणार आहे. तर पोस्टल आणि सर्व्हिस व्हॉटरच्या मतमोजणीचा एक राउंड होणार आहे. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. तर गुहागर आणि दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. हे पाचही विद्यमान आमदार यावेळी पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात आहे. मात्र गुहागर मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडून आलेले भास्कर जाधव यावेळी मात्र शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेनेची ताकद सध्या तरी वाढलेली दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जागा वाढतात की कमी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण 60.96 टक्के मतदान झालं. यावेळी एकूण 10 लाख 13 हजार 555 मतदार होते. पैकी 7 लाख 98 हजार 879 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी नेमका कुणाच्या बाजूने कौल दिला आहे हे गुरुवारी निकालानंतर स्पष्ट होईल. पण चिपळूण आणि दापोली विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यांच्यासमोर आव्हान आहे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांचं. तर चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांची हॅटट्रिक राष्ट्रवादीचे शेखर निकम रोखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडी आणि प्रशासनाच्या मतमोजणी तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.Body:मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

शिवसेना गड राखणार की विरोधक मारणार बाजी, आज होणार स्पष्टConclusion:मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

शिवसेना गड राखणार की विरोधक मारणार बाजी, आज होणार स्पष्ट
Last Updated : Oct 23, 2019, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.