रत्नागिरी - जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. तसेच मोजकेच लोक यावेळी हजर होते.
पोलीस पथकाच्या संचलनाने सर्वांचे लक्ष देखील वेधून घेतले. तसेच कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या योध्यांचा सन्मान देखील पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक देखील शेअर करण्यात आली होती.
हेही वाचा - नवरा-बायकोतील अंड्यांचे भांडण पोहोचले पोलीस ठाण्यात!