रत्नागिरी - गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण फक्त गणेश चतुर्थीच्या 30 दिवस अगोदर सुरू करावे अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
सध्या कोरोनामुळे उद्धभवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी मंडळींना सोयीचे व्हावे. यासाठी सध्याचे रेल्वेचे 120 दिवसांचे आगाऊ आरक्षण रद्द करावे आणि गणेश चथुर्तीच्या 30 दिवस अगोदर रेल्वेचे आगाऊ आरक्षण सुरू करावे. याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून विनंती केली आहे.
गणेशोत्सवातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण 17 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. अशावेळी कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचे आरक्षण 120 दिवस अगोदर सुरू न करता 30 दिवसाआधी तिकीट बुकींग सुरू करावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी केली आहे. या निर्णयामुळे रेल्वे आरक्षणासाठीसुद्धा गर्दी होणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.