ETV Bharat / state

DELTA PLUS : रत्नागिरीत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नऊ रुग्ण.. मात्र जिल्हाधिकारीच अनभिज्ञ ?

author img

By

Published : Jun 23, 2021, 5:53 PM IST

Updated : Jun 23, 2021, 8:23 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक म्हणजे नऊ रुग्ण आढळले आहेत. मात्र येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना याबद्दल काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

corona-variant-delta-plus
corona-variant-delta-plus

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक म्हणजे नऊ रुग्ण आढळले आहेत. मात्र येथील जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना याबद्दल काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेल्या डेल्टा प्लस विषयी अजूनही शासनाकडून माहिती आलेली नाही असे सष्टीकरण रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

रत्नागिरीत नऊ रुग्ण डेल्टा प्लस'चे असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी याबाबत अधिकृतरित्या जाहीर केले असून तसा व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार व्हेरीएंट ऑफ कंर्सन असं परिपत्रक आलेले आहे, त्यामध्ये डेल्टा प्लस असा उल्लेख नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी म्हटले आहे. मात्र एकूणच जिल्ह्यातही या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

जिल्हाधिकारी काय म्हणतात -

याबद्दल जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले की, जिल्हा प्रशासनाला आलेल्या माहितीत फक्त व्हेरियट ऑफ कन्सर्न आणि व्हेरियट अंडर इन्वेस्टीगेशन अशा स्वरुपाचा आदेश आम्हाला मिळाला आहे. माननीय आरोग्य मंत्री यांनी जाहीर केले की, रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंट सापडला आहे, याच्याशी मी सहमत आहे. आरोग्य मंत्री यांना हे जाहीर करण्याचा अधिकार आहे. संगमेश्वर तालुक्यातील नऊ लोकांमध्ये वेगळाच विषाणू दिसतोय म्हणून माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे आम्ही इथल्या भागांमध्ये 6000 लोकांचे टेस्टिंग केले आहे. यामध्ये 141 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डेल्टा प्लस सारखा विषाणू सापडलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांचे 10 दिवस पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संगमेश्वर परिसरातील चार गावांशिवाय आणखी दोन गावांत कंन्टेंटमेंट झोन जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिलीय.

जिल्हा शल्य चिकित्सक काय म्हणतात -

दरम्यान याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की, व्हेरीएंट ऑफ कंर्सन असं परिपत्रक आमच्याकडे आलेले आहे. त्यामध्ये डेल्टा प्लस असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही. मात्र आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये तथ्य असावे असेही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान हे जे ९ रुग्ण आहेत, ते संगमेश्वरमधील आहेत.

Last Updated : Jun 23, 2021, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.