ETV Bharat / state

...तर जशास तसं उत्तर देऊ, राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियांनंतर निलेश राणेंचा इशारा - निलेश राणेंचा इशारा

आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा आमदारावर कुणी हात टाकला तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.

Nilesh Rane comment on NCP reactions on gopichand padalkar
राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियानंतर निलेश राणेंचा इशारा
author img

By

Published : Jun 25, 2020, 6:45 PM IST

Updated : Jun 25, 2020, 8:41 PM IST

रत्नागिरी - आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा आमदारावर कुणी हात टाकला तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. ते आज (गुरुवार) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीतून या वक्तव्याविरोधात तिखट प्रतिक्रिया येत असून, या वक्तव्याचा राज्यभर निषेधही करण्यात आला. दरम्यान, पडळकर यांच्या विधानाबाबत माजी खासदार निलेश राणे यांना विचारलं असता, राणे म्हणाले की, 'पडळकर यांनी काय विधान केलं त्याच्या मी फार खोलात जाणार नाही, आमच्या मोदी साहेबांवरसुद्धा अतिशय खालच्या दर्जाची टीका राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाल्यांनी केली आहे. आता पडळकरांच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या धमक्या सुरू झाल्याचे राणे म्हणाले.

...तर जशास तसं उत्तर देऊ, राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियांनंतर निलेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादीची काही लोकं आम्ही याला काळं फासू, अंगावर जाऊ, धडा शिकवू अशा धमक्या द्यायला लागले आहेत. पडळकर हे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या अंगावर जायच्या वार्ता आमच्याबरोबर करू नका, कारण आम्ही काही गप्प बसणार नाही. आम्हीही जशास तसं उत्तर देऊ. फक्त गृहखातं तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्ही वाट्टेल ते कराल हा तुमचा गैरसमज ठरेल. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला, आमदाराला काही जरी झालं, तरी आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

हे सर्व जे काही चाललं आहे ते राष्ट्रवादीने आधी थांबवावं. मच्या पक्षाच्या नेत्यांबाबत घाणेरड्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. आम्ही नाही कोणाच्या अंगावर जायच्या भाषा केल्या. तुम्हाला एवढं का झोबतं. त्यामुळे तुम्ही आधी थांबवावं, आम्ही थांबवू असेही राणे यावेळी म्हणाले.

ते पडळकरांचं वैयक्तीक मतं

दरम्यान, पडळकर काय बोललेत हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर बोलले असतील. पण दुसरी वस्तुस्थितीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. आमच्या नेत्यांवर जेव्हा टीका होते, तेव्हा आम्ही अशी पावलं उचलतो का? अंगावर जायचे विषय काढतो का? त्यामुळे तुम्ही धमकी द्यायची नाही असा इशारा राणे यांनी दिला आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.