रत्नागिरी - जिल्ह्यात सोमवारी 52 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1262 झाली आहे. दरम्यान 23 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 749 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोविड केअर सेंटर, पेढांबे 7, कोव्हीड केअर सेंटर देवधे,लांजा 5, पाचल, रायपाटण 4 आणि 7 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. आजपर्यंत एकूण 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
84 ॲक्टिव्ह कन्टेटमेंट झोन -
जिल्ह्यात सध्या 84 ॲक्टिव्ह कन्टेटमेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावे, दापोलीमध्ये 7 गावांमध्ये, खेडमधील 23 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कन्टेटमेंट झोन आहेत.
12 हजारांपेक्षा जास्त निगेटिव्ह -
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 14 हजार 158 नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी 13 हजार 724 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1262 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 12 हजार 462 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 434 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 434 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ठ नाहीत.