ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी जनाची नाही, निदान मनाची तरी लाज बाळगावी - नारायण राणे - देवरूख

उद्धव ठाकरेंनी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगावी, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
author img

By

Published : Mar 29, 2019, 9:56 PM IST

रत्नागिरी - उद्धव ठाकरेंनी जनाची नाही, तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी जहरी टीका खासदार नारायण राणेंनी देवरुख येथील सभेत केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गांधीनगर येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे तेथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राणेंनी ठाकरेंवर टीका केली.

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता गांधीनगरला अमित शहा यांचा अर्ज भरायला निघाले आहेत. याच उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती. एवढी घाणेरडी टीका करायची आणि त्यांचाच निवडणूक अर्ज भरायला जायचे, ही लाचारी आहे. ही लाचारी मतलबी आहे, सत्तेसाठी आहे. सत्ता आहे पैशासाठी आणि पैसा आहे सत्तेसाठी आणि हे उद्धव ठाकरेंच्या रक्तात भिनलेले आहे.

शिवसेनेवर टीका

शिवसेना फक्त ठाकरे कुटुंबासाठी आहे, बाकी कोणासाठी नाही. १९६६ मध्ये ६० टक्के मराठी माणूस मुंबईत होता. मात्र, आता फक्त १८ टक्के आहे. ही वेळ शिवसेनेमुळे आली. जिथे शिवसेना तिथे भ्रष्टाचार, तिथे बट्ट्याबोळ, अशी टीका नारायण राणेंनी यावेळी शिवसेनेवर केली.

Intro:उद्धव ठाकरेंनी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगावी -- नारायण राणे

रत्नागिरी, प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता गांधीनगरला अमित शहा यांचा फॉर्म भरायला निघाले आहेत.. याच उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती.. एवढी घाणेरडी टीका करायची आणि त्यांचाच फॉर्म भरायला जायचं ही लाचारी आहे.. ही लाचारी मतलबी आहे, सत्तेसाठी आहे, सत्ता आहे पैशासाठी आणि पैसा आहे सत्तेसाठी.. आणि हे उद्धव ठाकरेच्या रक्तात भिनलेली आहे.. उद्धव ठाकरेंनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी अशी टीका खासदार नारायण राणेंनी देवरुख इथल्या सभेत केली..

शिवसेनेवर टीका

शिवसेना फक्त ठाकरे कुटुंबासाठी आहे, बाकी कोणासाठी नाही.. 1966 मध्ये 60 टक्के मराठी माणूस मुंबईत होता, मात्र आता फक्त 18 टक्के आहे. ही वेळ शिवसेनेमुळे आली.. जिथे शिवसेना तिथे भ्रष्टाचार, तिथे बट्ट्याबोळ अशी टीका नारायण राणेंनी यावेळी शिवसेनेवर केली..

Byte-- खासदार नारायण राणे -- अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षBody:उद्धव ठाकरेंनी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगावी -- नारायण राणेConclusion:उद्धव ठाकरेंनी जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगावी -- नारायण राणे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.