ETV Bharat / state

रत्नागिरीत पावसाचा हाहाकार, चिपळूणला पुराचा वेढा; मुंबई-गोवा महामार्ग बंद

शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. ढील आणखी तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दि्ला आहे.

रत्नागिरीत पावसाचा हाहाकार
रत्नागिरीत पावसाचा हाहाकार
author img

By

Published : Jul 22, 2021, 11:17 AM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार हाहाकार उडवला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. चिपळूण, खेड तसेच रत्नागिरीतीलही काही भाग जलमय झाला आहे. तसेच मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. तसेच पुढील आणखी तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दि्ला आहे.

चिपळूणला पुराचा वेढा
चिपळूणला पुराचा वेढा
चिपळूण पुराच्या पाण्यातवाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झालं आहे. अनेक ठिकाणी लोकं अडकून पडली आहेत. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे.. तर खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे.
रत्नागिरीत पावसाचा हाहाकार

खेडमध्ये पुराचं पाणी, मुंबई-गोवा महामार्ग बंद-

खेड शहरात जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरलं आहे. रात्रीपासून पाणी बाजारपेठेत घुसलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत चार फुटांचे पाणी आहे. चांदेराई लांजा आणि चांदेराई रत्नागिरी मार्गावरती पाणी आल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावरील वाहतूक बंद आहे. लांजा शहरातील हॅप्पी धाब्यामध्ये पाणी शिरले आहे. तसेच
अतिवृष्टीमुळे बावनदीला पुर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रीटीशकालीन बावनदी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.