ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन; येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढणार

गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरीत मान्सून दाखल झाला. जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 203 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 22.56 मिमी पडला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 289.44 सरासरीने 2605 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

Ratnagiri
पाऊस
author img

By

Published : Jun 12, 2020, 4:20 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. जिल्ह्यात एक दिवस उशिराने मान्सून दाखल झाला. मात्र जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 203 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी 22.56 मिमी पडला आहे.

गुरुवारी दुपारनंतर मान्सून दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरी पावसाला सुरुवात झाल्यापासून तो ठराविक काळाने सरीवर सरी कोसळत आहेत.

गेल्या 24 तासात सर्वाधिक 66 मिमी पाऊस राजापूर तालुक्यात झाला. तर लांजा तालुक्यात 40 मिमी आणि रत्नागिरीत 34 मिमी पावसाची नोंद झाली. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या दापोली तालुक्यात 21 मिमी पावसाची नोंद झाली. मंडणगड तालुक्यातही तुरळक सरी बरसल्या. गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यात प्रत्येकी 10 मिमी तर संगमेश्वर तालुक्यात 12 मिमी पावसाची नोंद झाली.

या पावसाळ्यात आत्तापर्यंत जिल्ह्यात 289.44 सरासरीने 2605 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. येणाऱ्या 24 तासात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.