ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात 27 हजार घरांची पडझड, नुकसानग्रस्त भागाची उदय सामंत करणार पाहणी

author img

By

Published : Jun 6, 2020, 5:20 AM IST

दापोली तालुक्यात 18 हजार, मंडणगड तालुक्यात 8 हजार, खेडमध्ये 567, गुहागरमध्ये 196, चिपळूणमध्ये 322, संगमेश्वरमध्ये 48, रत्नागिरीत 629, लांजामध्ये 6, राजापूरमध्ये 14 घरांचं नुकसान झालं आहे. तर 6 जण जखमी झाले आहे. तर 11 जनावरं मृत झाली आहेत. 3200 झाडं पडली आहेत, 930 विद्युत पोल पडले आहेत. शेतीचंही नुकसान झालं आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

Ratnagiri
उदय सामंत

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाचा फटका जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला मोठ्या प्रमाणात बसला असून किनारपट्टी पुर्णतः विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे गुरुवारी संध्याकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 27 हजार 782 घरांची पडझड झाली असून दापोली तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळाचा बुधवारी जिल्ह्याला मोठा फटका बसला असून सर्वाधिक नुकसान दापोली तालुक्यात झाले आहे. याबाबत माहिती देताना सामंत म्हणाले की, या वादळाचा मोठा फटका गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यांना बसला आहे. गुरुवारच्या संध्याकाळच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 27782 घरांची पडझड झाली आहे.

यातील काही घरांचं अंशतः तसेच काही घरांचं पूर्ण नुकसान झालं आहे. दापोली तालुक्यात 18 हजार, मंडणगड तालुक्यात 8 हजार, खेडमध्ये 567, गुहागरमध्ये 196, चिपळूणमध्ये 322, संगमेश्वरमध्ये 48, रत्नागिरीत 629, लांजामध्ये 6, राजापूरमध्ये 14 घरांचं नुकसान झालं आहे. तर 6 जण जखमी झाले आहे. तर 11 जनावरं मृत झाली आहेत. 3200 झाडं पडली आहेत, 930 विद्युत पोल पडले आहेत. शेतीचंही नुकसान झालं आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान ज्यांचं अंशतः आणि पुर्णतः नुकसान झालं आहे, त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यावर त्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय पुढच्या 48 तासांत झाला पाहिजे, आशा प्रकारे आपण यंत्रणांना सूचना दिल्या असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं. तसेच जवळपास 41 शासकीय मालमत्ताचं नुकसान झालं आहे. महावितरणचं जवळपास 25 कोटींचे नुकसान झालं आहे. हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान आपण स्वतः शनिवारपासून दापोली मंडणगडचा दौरा करणार असून नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. नुकसानग्रस्त भागात काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.