ETV Bharat / health-and-lifestyle

मनुका मध स्तनाचा कर्करोग बरा करू शकतो? शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश - Manuka Honey Health Benefits - MANUKA HONEY HEALTH BENEFITS

Manuka Honey Health Benefits: वनस्पती पासून तयार होणाऱ्या मनुका मधानं सुपरफूड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. एका संशोधनानुसार मनुका मधामध्ये अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्याचा उपयोग जखमा, घसा खवखवणे, अल्सर आणि मुरुमांवर उपचार करण्यासाठी तसंच स्तनाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Manuka Honey Health Benefits
मनुका मध (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 23, 2024, 7:45 PM IST

Manuka Honey Health Benefits: आजपर्यंत आपण मधमाश्यांनी तयार केलेलं मध वापरत आलो आहेत. परंतु आता बाजारात मनुका मधानं आपला ठस्सा कायम केलाय. मधमाश्या विविध फुलांवर बसून परागकण गोळा करत त्यापासून मध तयार करतात. परंतु मनुका मध वनस्पतीच्या रसापासून बनवलेला अर्ध अपारदर्शक, मलईदार पदार्थ आहे. मनुका वनस्पती एक फुलांचं झुडूप असून ते प्रामुख्यानं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आढळतं.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशियामध्ये वाढणाऱ्या चहाच्या झाडाच्या (लेप्टोस्पर्मम स्कोपेरियम) फुलांपासून अमृत गोळा करून या प्रकारचं मध तयार केलं जातं. ते काहीसे तेलकट असते.

ते इतके खास का आहे? मनुका मधामध्ये मिथाइलग्लायॉक्सल नावाचा सक्रिय घटक असतो. हा घटक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारं आहे. त्यात अँटीव्हायरल गुणधर्म देखील आहेत. ज्यामुळे घसा खवखवणं बंद करते आणि त्वचा ताजी आणि कोमल ठेवते.

ते सामान्य मधापेक्षा वेगळे कसे आहे? नियमित मधाच्या उलट, मनुका नावाच्या फुलांच्या रसापासून तयार केला जातो. त्यात आवश्यक खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असं संशोधकांचं म्हणणे आहे.

स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त : अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, मनुका मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे बॅक्टेरिया नष्ट करण्यासोबतच शरीरावरील सूज कमी करते. अलीकडे, कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस (UCLA) द्वारे केलेल्या प्राथमिक संशोधनात असं दिसून आलं आहे की, मनुका मध स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये मदत करू शकते. डॉ. डायना मार्केझ गरबान यांनी हा अभ्यास केला आहे. यामुळे पारंपरिक केमोथेरपीला नैसर्गिक, कमी विषारी पर्यायी उपचार विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे. कर्करोगाच्या उपचारात नैसर्गिक रासायनिक संयुगांचे फायदे पूर्णपणे समजून घेण्यासाठी पुढील संशोधन होणे आवश्यक आहे. मार्केझ गार्बन यांनी विश्वास व्यक्त केला की, हा अभ्यास भविष्यातील संशोधनासाठी मजबूत पाया ठरेल.

प्रयोगाबद्दल काय?: इस्ट्रोजेन रिसेप्टर पॉझिटिव्ह, ट्रिपल निगेटिव्ह (ज्यामध्ये पेशींना कोणतेही रिसेप्टर्स नसतात) संशोधकांनी प्रयोगशाळेत कर्करोगाच्या पेशी वाढवल्या. काही पेशींवर मनुका मध आणि मनुका मध पावडरने उपचार करण्यात आले. संशोधकांना असं आढळून आलं की, जेव्हा टॅमॉक्सिफेन, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे अँटी-इस्ट्रोजेन उपचार, मनुका मधाच्या संयोगाने वापरण्यात आले, तेव्हा ईआर-पॉझिटिव्ह स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींचा प्रसार लक्षणीयरीत्या कमी झाला. पेशींचा बारकाईने तपास केल्यावर असं दिसून आलं की, मधामुळे रक्तातील इस्ट्रोजेनचं प्रमाण आणि पेशींमधील रिसेप्टर्स कमी झाले आहेत. शिवाय, ट्यूमर पेशी स्वतःहून मरण्यास प्रवृत्त झाल्यामुळे कर्करोगाच्या वाढीची प्रक्रिया देखील विस्कळीत होते. नंतर संशोधकांनी उंदरांवर अभ्यास केला. मानवी ईआर पॉझिटिव्ह स्तन पेशी उंदरांमध्ये तयार करण्यात आल्या आणि ट्यूमर वाढू दिला. त्यानंतर काहींना मनुका मध देण्यात आले. सामान्य उंदरांच्या तुलनेत मध पिणाऱ्या उंदरांमध्ये ट्यूमरची वाढ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे संशोधकांना आढळले. निरोगी पेशींना हानी न पोहोचवता मानवी स्तनाच्या कर्करोगाच्या ट्यूमरची वाढ आणि प्रसार 84% पर्यंत कमी झालेली दिसली.

काय फायदा: संशोधकांना असं आढळलं की, मनुका मधासारख्या नैसर्गिक रासायनिक संयुगामध्ये ट्यूमर कमी करण्याचे गुणधर्म आहेत. संशोधकांचा असा विश्वास आहे की, भविष्यात मनुका मध एक अतिरिक्त औषध किंवा स्पष्ट पर्यायी थेरपी म्हणून विकसित होऊ शकते. डॉक्टरांना विश्वास आहे की, कर्करोगाच्या पेशी तसंच निरोगी पेशी नष्ट करणाऱ्या कर्करोगाच्या औषधांचा हा पर्याय असू शकतो.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/39064812/https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/39064812/

हेही वाचा

'या' 6 सवयी तुम्हाला ठेवतात कर्करोगापासून लांब; जाणून घ्या तंदुरुस्त राहण्याचा फॉर्म्युला - Tips to Prevent Cancer

मोबाईलच्या अतिवापरामुळं होतोय कर्करोग? फोनचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम - Does mobile phones cause cancer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.