ETV Bharat / state

तुम्हाला जरांगे आणि बहुजन समाज नको आहे का? संभाजीराजेंचा महायुती सरकारला सवाल - Manoj Jarange Hunger Strike

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे यांची आरक्षणासाठी अधिवेशन घेण्याची मागणी आहे. सरकारने अधिवेशन घेऊन आधीच्या सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण कसं टिकवणार तेही सांगावं, असा सवालही संभाजीराजे छत्रपतींनी विचारला आहे.

manoj jarange and sambhaji raje
मनोज जरांगे पाटील आणि संभाजी राजे (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 6:56 PM IST

जालना Manoj Jarange Hunger Strike :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी जालन्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. जरांगे पाटील हे यंदाच्या वर्षात सहाव्यांदा आमरण उपोषण करीत आहेत, खरं तर ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. एक व्यक्ती आरक्षणासाठी जीवाची बाजी लावत आहे आणि त्यावर सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. डॉक्टरांकडून मी सगळे रिपोर्ट मागवून घेतले आहेत. छत्रपती घराण्यातील व्यक्ती म्हणून त्यांची तब्येत पाहायला आलो आहे. तब्येत खराब झालेली असताना सरकार एअर कंडिशनमध्ये बसले आहे. विरोधक बघ्याची भूमिका घेत आहेत हे चालणार नाही, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. संभाजीराजे छत्रपती जालन्यातील आंतरवालीतून बोलत होते.

सरकारने आरक्षण कसं टिकवणार तेही सांगावं : मनोज जरांगे यांचे मेडिकल रिपोर्ट फार खराब आले आहेत. त्यांना कधीही काहीही होऊ शकतं. ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेणार असल्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे. सरकारने आरक्षण देणार आहे की नाही ते आताच सांगून टाकावं. तिकडे एसीमध्ये बसता आणि मनोजदादा बोलता हे बरोबर नाही. मनोज जरांगे यांचा लढा स्वतःसाठी नाही. शाहू महाराजांनी मराठ्यांनासुद्धा आरक्षण दिलं होतं. मी कायमच जरांगेंबरोबर आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक जवळ आली असतानाही तुम्हाला जरांगे आणि बहुजन समाज नको आहे का? असा टोलाही संभाजीराजेंनी महायुती सरकारला लगावला. महायुती सरकारने आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं त्यावर नंतर काहीही भाष्य केलं नाही. जरांगे यांची आरक्षणासाठी अधिवेशन घेण्याची मागणी आहे. सरकारने अधिवेशन घेऊन आधीच्या सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण कसं टिकवणार तेही सांगावं, असा सवालही संभाजीराजे छत्रपतींनी विचारला आहे.

ओबीसींनी छत्रपतींचा फोटो असलेला झेंडा फाडला : शाहू, फुले आणि आंबेडकरांची नावं घेता मग जरा न्यायाची भूमिकासुद्धा घ्यायला शिका. मनोज जरांगे यांची तब्येत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे भरपूर विमानं आहेत. मग इकडे या आणि त्यांच्या तब्येतीचे रिपोर्ट जाणून घ्या. त्यांना काही झाले तर सरकार आणि विरोधक दोघेही जबाबदार असतील, असं म्हणत जरांगे यांना पाणी पाजण्याची गरज असेल त्यावेळी मी इथे यायला तयार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलंय. घटनात्मक पद्धतीने आंदोलन असेल तर चुकीचे नाही.धनगर ओबीसींचे नेते आंदोलन करू शकतात. मग जरांगे यांचं आंदोलन होऊ नये म्हणून आंदोलन करायचं हा सुसंस्कृतपणा नाही. काल ओबीसी लोकांनी छत्रपतींचा फोटो असलेला झेंडा फाडला, खरं तर शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत.सगळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले, असंही संभाजीराजेंनी सांगितलं.

हिंसाचार वाढेल असं कुणी कृत्य करू नये: ओबीसी आंदोलनकर्त्यांनी संवैधानिक पद्धतीने मागण्या केल्या असत्या तर गेलो असतो. प्रति आंदोलन कुणी सुरू केलं हे काही लपून राहत नाही. प्रति आंदोलन कुणी सुरु केलं हे काही लपून राहत नाही, असंही ओबीसी आंदोलनावर संभाजीराजे म्हणालेत. मराठा आणि ओबीसी आपण सगळे महाराष्ट्रात आहोत आणि हा संतांचा महाराष्ट्र आहे.सगळ्यांना माझी विनंती आहे की, हिंसाचार वाढेल असं कुणी कृत्य करू नये, आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावं,जाती आणि समाजात तेढ निर्माण होईल, असं कोणतंही काम करू नये, असंही संभाजीराजे छत्रपतींनी अधोरेखित केलंय.

हेही वाचाः

सरकारकडून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाची बोळवण, नेत्यांचा आरोप - Maratha OBC Reservation

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; शंभूराज देसाईंच्या विनंतीनंतर घेतले उपचार - Manoj Jarange Health Deteriorated

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.