ETV Bharat / opinion

आयुष्मान भारत : भारताच्या आरोग्य सेवा प्रवासातील एक मैलाचा दगड - Ayushman Bharat

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात AB-PMJAY चा यंदा सहावा वर्धापन दिन आहे. यानिमित्तानं ही योजना किती उत्तम आहे. सरकार या योजनेच्या माध्यमातून तळागाळातीलच नाही तर सर्वच नागरिकांच्यासाठी कशा सुविधा उपलब्ध करुन देत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांचा माहितीपूर्ण लेख.

आयुष्मान भारत
आयुष्मान भारत (संग्रहित चित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 7:15 PM IST

Updated : Sep 23, 2024, 7:23 PM IST

नवी दिल्ली : आपण आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा (AB-PMJAY) सहावा वर्धापन दिन साजरा करत असताना, हा अत्यंत अभिमानाचा आणि चिंतनाचा क्षण आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सप्टेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला, AB-PMJAY जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा उपक्रमांपैकी एक बनला आहे. देशातील सर्व नागरिकांना, विशेषत: सर्वात असुरक्षित लोकांसाठी न्याय्य आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या या सरकारच्या वचनबद्धतेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.

गेल्या सहा वर्षांत, या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाखो लोकांना फायदा झाला आहे. यातून नियमित उपचार आणि अनेकांना जीवनरक्षक उपचार दिले आहेत. एबी-पीएमजेएवायचा प्रवास हा आपल्या लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याचे उद्दिष्ट घेऊन देश एक झाल्यावर काय साध्य केले जाऊ शकते याचा पुरावा आहे.

आरोग्य सेवेचा कायपालट - आयुष्मान भारतचे मुख्य ध्येय सोपे पण गहन आहे : कोणत्याही भारतीयाला त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागणार नाही याची खात्री ही योजना देते. या योजनेतून दुय्यम आणि साध्या रुग्णालयातील देखभाल कव्हर करण्यासाठी प्रति कुटुंब 5 लाख रुपये वार्षिक कव्हरेजसह, AB-PMJAY ने आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना देशातील काही सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

AB PM-JAY चे फायदे 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीची पर्वा न करता विस्तारित करण्याचा भारत सरकारचा अलीकडील निर्णय हा आपल्या देशातील बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीचा विचार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यापूर्वी, सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कुटुंबे-मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते (आशा), अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेच्या कवचाखाली आणण्यात आलं होतं. आजमितीस, 55 कोटींहून अधिक लोक या योजनेंतर्गत आरोग्य सेवांसाठी पात्र आहेत आणि 7.5 कोटींहून अधिक उपचारांसाठी एक लाख कोटींची मदत यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. एकेकाळी खूप मोठ्या आरोग्य खर्चामुळे गरिबीत ढकललेल्या कुटुंबांना आता अशा संकटांपासून संरक्षण देणारी आर्थिक ढाल यामुळे मिळाली आहे. खूप मोठ्या आरोग्य खर्चाचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. लाभार्थ्यांकडून सरकारची प्रशंसा वेळोवेळी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांपासून रोजंदारी मजुरांपर्यंत अनेकांना याचा लाभ झाला आहे. आपले पैसे या योजनेमुळे कसे वाचले याची अनेकांनी माहिती दिली आहे. या अर्थाने आयुष्मान भारतने आपले वचन खरेच पूर्ण केले आहे.

या योजनेची व्याप्ती सर्वसमावेशक आहे, ज्यामध्ये हृदयाच्या बायपास आणि सांधे बदलण्यासारख्या गुतागुंतीच्या शस्त्रक्रियांपासून ते कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसारख्या आजारांवरील उपचारांपर्यंत 1900 हून अधिक रोगांवर उपायांचा समावेश आहे. हे असे उपचार आहेत जे पूर्वी अनेकांच्या आवाक्याबाहेरचे वाटत होते, परंतु AB-PMJAY ने ते सर्वांसाठी सुलभ, परवडणारे आणि उपलब्ध केले आहेत.

योजनेचा विस्तार - AB-PMJAY चे एक वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य सुविधा देणारं नेटवर्क मजबूत करण्याची क्षमता यामध्ये आहे. आज, 13,000 पेक्षा जास्त खासगी रुग्णालयांसह संपूर्ण भारतातील 29,000 हून अधिक रुग्णालये या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत. हे नेटवर्क ग्रामीण आणि शहरी भागात सारखेच पसरलेले आहे. यातून एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे, देशाच्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्यांनाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकतात. योजनेच्या अनोख्या सुविधेमुळे लाभार्थी ज्या राज्यातील आहेत त्याव्यतिरिक्त देशभरातील कोणत्याही सक्षम रुग्णालयांमध्ये ते उपचार घेऊ शकतात.

रुग्णालयांच्या या विशाल नेटवर्कला मजबूत IT पायाभूत सुविधांद्वारे जोडलं आहे. त्यामुळे दाव्याच्या निपटाऱ्यांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि गती येते. आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि पेपरलेस क्लेम प्रोसेसिंगमुळे फसवणूक आणि अकार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कल्याणकारी योजनांमध्ये अनेकदा याचा अडसर येत असतो. तोच या योजनेमध्ये येत नाही.

आयुष्मान भारतच्या यशाने आरोग्यसेवा परिसंस्थेच्या इतर भागांमध्येही सुधारणा घडवून आणल्या आहेत. दर्जेदार आरोग्यसेवेवर योजनेच्या भर असल्यानं सार्वजनिक आणि खासगी दोन्ही रुग्णालयांना त्यांच्या पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यास प्रवृत्त केलं आहे. याव्यतिरिक्त, यातून निरोगी स्पर्धेचे वातावरण निर्माण केले आहे, सेवा देणाऱ्या रुग्णालयांना रुग्णांची काळजी वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

सर्वंकष आरोग्य सेवेवर लक्ष - आयुष्मान भारत म्हणजे केवळ रुग्णालयातील काळजी नाही. AB-PMJAY सोबत, सरकार आयुष्मान आरोग्य मंदिर (AAM) च्या निर्मितीद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी देखील काम करत आहे. ही आरोग्यसेवा केंद्रे रोग प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करतात. आतापर्यंत, भारतभर 1.73 लाखांहून अधिक AAMs स्थापन करण्यात आली आहेत, जी सामान्य आजार आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांवर मोफत तपासणी, निदान आणि औषधे प्रदान करतात.

ही केंद्रे अधिक व्यापक आणि सर्वांगीण आरोग्य सेवा मॉडेलकडे जाण्याच्या सरकारच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहेत. लोक निरोगी राहावेत आणि लवकर निदान व्हावे, जेणेकरुन हॉस्पिटलायझेशनची गरज शक्यतो लागूच नये यासाठी तसंच आरोग्यसेवा अधिक चांगली बनवू अशी आशा आहे.

आव्हानांवर मात करण्याची गरज - आपण आयुष्मान भारतच्या यशाचा उत्सव साजरा करत असताना, आपणा समोरील आव्हाने देखील स्वीकारली पाहिजेत. योजनेचे प्रमाण खूप मोठे आहे आणि त्यासोबत ती सतत परिस्थितीशी जुळवून घेण्याची, सुधारण्याची जबाबदारी सरकारवर येते. आम्ही योजनेचा आवाका वाढवण्यासाठी, रुग्णालयांना वेळेवर पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक लाभार्थींना पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत काम करत आहोत.

पुढे जाऊन, आम्ही आयुष्मान भारतला बळकट करत राहू. यातून अशी खात्री करू की योजना भारताच्या सर्वसमावेशक, परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेच्या प्रवासात तो आघाडीवर राहील. आम्ही योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या उपचारांची यादी विस्तारित करण्यासाठी, पॅनेलमधील रुग्णालयांची संख्या आणखी वाढवण्यासाठी आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या यशावर पुढे जाण्यासाठी वचनबद्ध आहोत.

निरोगी भारताची दृष्टी - केंद्रीय आरोग्य मंत्री या नात्याने माझा ठाम विश्वास आहे की, देशाचे आरोग्य हा त्याच्या समृद्धीचा पाया आहे. निरोगी लोकसंख्या ही देशाची वाढ, उत्पादकता आणि नवकल्पना यामध्ये योगदान देण्यासाठी अधिक सुसज्ज आहे. आरोग्यदायी, मजबूत आणि विकसित भारताच्या या व्हिजनमध्ये आयुष्मान भारत केंद्रस्थानी आहे. या योजनेचे आतापर्यंतचे यश हे सरकार, आरोग्य सेवा प्रदाते आणि लोक यांच्यातील कठोर परिश्रम, समर्पण आणि सहकार्य याचे फलित आहे. आम्ही प्रत्येक नागरिकाच्या कल्याण आणि आरोग्याच्यासाठी वचनबद्ध आहोत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त, आपण सर्वसमावेशक, सुलभ आणि दयाळू अशी आरोग्यसेवा व्यवस्था निर्माण करण्याच्या आपल्या समर्पणाची पुष्टी करूया. एकत्रितपणे, आम्ही पुढील पिढ्यांसाठी निरोगी भारताची निर्मिती करत राहू.

हेही वाचा...

  1. आयुष्यमान भारत योजनेच्या अटीमुळं नागरिक लाभापासून वंचितच, तुम्ही या 'निकषात' बसताय का?; वाचा सविस्तर - Ayushman Bharat Yojana
  2. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आरोग्य विम्यासाठी वयोमर्यादा नाही, वाचा नवीन नियम - Health Insurance For Senior Citizen

Last Updated : Sep 23, 2024, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.