ETV Bharat / state

बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम एन्काउंटरमध्ये ठार; पोलिसांनी घातली गोळी अन् 'गेम फिनिश' - Badlapur Rape Accused Encounter - BADLAPUR RAPE ACCUSED ENCOUNTER

Badlapur Rape Case Accused Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालाय. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत.

Badlapur Girl Rape Case
अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 7:30 PM IST

Updated : Sep 23, 2024, 10:58 PM IST

मुंबई Badlapur Rape Case Accused Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. अक्षय शिंदेला बदलापूर येथे घेऊन जात असताना, त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली. यावेळी पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय. अक्षयला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार : अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या आई आणि भावानं नकार दिलाय. अक्षयची आई आणि भाऊ रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्ही अक्षय शिंदेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. आम्हाला पोलिसांवरती संशय आहे. या प्रकरणाला पोलीस आणि शाळा व्यवस्थापनच जबाबदार आहे. जेलमध्ये असताना पोलिसांनी त्याला खूप मारलं. हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी त्याला ठार मारलं असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.

अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)

पोलीस कर्मचारी जखमी : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे हा तळोजा कारागृहात होता. तेथून त्याला पोलीस बदलापूर येथे घेवून जात होते. यावेळी आरोपीनं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली व त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नराधम आरोपी अक्षय शिंदेचा गेम झाला.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणं सर्व घटनाक्रम जशासतसा : तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी असलेला आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास बदलापूर पूर्व पोलीस ठाणे विविध गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक हे तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ट्रान्सफर वॉरंटसह गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 5.30 वा. सदर आरोपी यास पोलीस पथकानं तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले व त्यास घेवून ठाणे येथे येत असताना, सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. दरम्यान पोलीस वाहन मुंद्रा बायपास येथे आले. सदर आरोपीने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि / निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व दोन राऊंड इतरत्र फायर झाले.

आरोपीचा झाला गेम : स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी फायर केली असता, आरोपी यास लागून तो जखमी झाला. पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस अधिकारी निलेश मोरे व आरोपी अक्षय शिंदे यास उपचारकामी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय, कळवा येथे आणले. यावेळी डॉक्टरांनी तपासून पोलीस अधिकारी निलेश मोरे व इतर पोलीस यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे रेफर केले असून, आरोपीला तपासून मृत घोषित केले.

नेमकं प्रकरण काय? : बदलापूर येथील प्रसिद्ध शाळेतील चार वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपी अक्षय शिंदे (वय 23) याला अटक करण्यात आली होती.

राज्यात संतापाची लाट : बदलापूर शाळेतील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर रेल्वे स्थानकावर 'रेल रोको' आंदोलन करण्यात आलं होतं. आंदोलनामध्ये "नराधाम आरोपीला आमच्या स्वाधीन करा..., आम्ही त्याला फाशी देतो..., आरोपीला फाशी द्या...," अशी घोषणाबाजी संतप्त आंदोलकांनी केली होती.

'एसआयटी' करत होती तपास : काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आलं होतं. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळं तणावाचं वातावरण होतं. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं.

हेही वाचा -

  1. बदलापूर घटनेवरून राजकारण तापलं; विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप - Badlapur School Girls Case
  2. न्यायालयानं दखल घेतल्यानंतर जबाब नोंदवले; मुंबई उच्च न्यायालयानं पोलीस तपासावर ओढले ताशेरे - Badlapur Sexual Assault Case

Last Updated : Sep 23, 2024, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.