मुंबई Indian Openers Could Not Scored Century : आशियातील बलाढ्य संघांपैकी एक म्हणजे भारतीय क्रिकेट संघ. भारतीय क्रिकेट संघानं नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. भारतीय क्रिकेट संघानं सर्वाधिक वेळा आशिया चषकाचं विजेतेपदही पटकावलं आहे. यासह भारतीय संघानं 4 आयसीसी विश्वचषक जिंकले आहेत, ज्यात दोन एकदिवसीय आणि दोन T20 विश्वचषकांचा समावेश आहे. हे सर्व भारतीय फलंदाजांमुळंच शक्य झाले आहे. भारतीय क्रिकेट संघ नेहमीच त्यांच्या गोलंदाजीपेक्षा फलंदाजीसाठी मजबूत मानला जातो.
यामध्ये भारताच्या त्या फलंदाजांचं योगदान आहे, ज्यांनी डावाची सुरुवात करताना भारताला नेहमीच पुढं ठेवलं. अशा सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. पण आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा दुर्दैवी सलामीवीरांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी भारतासाठी सलामी दिली पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना एकही शतक झळकावता आलं नाही.
- भारतीय सलामीवीर ज्यांना एकही शतक झळकावता आलं नाही :
- आकाश चोप्रा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू हा अशा सलामीच्या फलंदाजांपैकी एक आहे, ज्यानं भारतासाठी डावाची सुरुवात केली पण भारतासाठी शतक झळकावता आलं नाही. तो भारतासाठी फक्त कसोटी क्रिकेट खेळला आहे. आकाशनं 10 कसोटी सामन्यांच्या 19 डावांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीनं 437 धावा केल्या आहेत.

- पार्थिव पटेल : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल देखील अशा सलामीवीरांपैकी एक आहे, ज्यानं भारतासाठी डावाची सुरुवात केली पण एकही शतक झळकावता आलं नाही. पार्थिव भारताकडून कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला, पण त्याला शतक झळकावता आलं नाही. पार्थिवनं 25 कसोटीत 6 अर्धशतकांसह 934 धावा, 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांसह 736 धावा आणि 2 T20 सामन्यात भारताकडून 36 धावा केल्या आहेत.

- अभिनव मुकंद : भारतीय संघाचा ओपनिंग बॅट्समन अभिनव मुकंदच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक नाही. मुकंदनं भारतासाठी फक्त 7 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 14 डावात 2 अर्धशतकांच्या मदतीनं एकूण 320 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :