ETV Bharat / state

रत्नागिरीत गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद - रत्नागिरी पाऊस

वादळामुळे जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच पाऊस आणि सोसाट्याचा वारा होता. राजापूर तालुक्यात 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर लांजामध्ये 162 मिमी, संगमेश्वरमध्ये 142 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये 100 मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

विक्रमी पाऊस
विक्रमी पाऊस
author img

By

Published : May 18, 2021, 5:38 AM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. रविवार सकाळी 8.30 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 132 .11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला असून, रत्नागिरी तालुक्यात 274 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मे महिन्यातील ही विक्रमी नोंद आहे.

रत्नागिरी आणि राजापूरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

तौक्ते चक्रीवादळामुळे हजारो घरांसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच पाऊस आणि सोसाट्याचा वारा होता. राजापूर तालुक्यात 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर लांजामध्ये 162 मिमी, संगमेश्वरमध्ये 142 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये 100 मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.