रत्नागिरी : ओवर हेड वायर ( Over head wire ) तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक मध्यरात्रीपासून विस्कळीत झाली आहे. दिवानखवटी ते विन्हेरे दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबून ( Some trains are delayed ) आहेत. तर काही गाड्या उशिराने धावत आहेत. गाड्या दोन ते चार तास उशिरा धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मंगगलोर एक्सप्रेस Ltd, मडगाव एक्सप्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत : ओव्हर हेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाचा फटका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील बसला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज रत्नागिरी दौरा आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे कोकणकन्या एक्सप्रेसने प्रवास करत आहेत. कोकणकन्या गाडी जवळपास 4 तास उशिराने धावत आहे. ओवरहेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. काही गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबून, तर काही गाड्या 2 ते 4 तास उशिराने धवत आहेत.