रत्नागिरी - जनता कर्फ्यु सुरू झाल्यापासून जिल्ह्यात एकही बस कुठल्याच डेपोतून धावलेली नाही. जिल्ह्यात दिवसाला एसटी बसच्या ४ हजार ५०० फेऱ्या विविध ठिकाणी सुटतात. मुंबई, पुणे ते अगदी रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्यात-छोट्या खेडेगावापर्यंत ही एसटी बस जाते. मात्र, आज कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी या लाल परीनेही मोठा वाटा पहायला मिळत आहे.
'कोकणाची लाईफ लाईन' म्हणून एसटीची कोकणातली ओळख आहे. मात्र जनता कर्फ्युच्या निमित्ताने आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठल्याच डेपोतून एकही एसटी बस सुटलेली नाही. याचाच आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
हेही वाचा - प्रसवकळा सुरू झालेल्या महिलेसाठी देवदूत म्हणून धावले पोलीस
हेही वाचा - Janatacurfew : अशीच इच्छाशक्ती 31 मार्चपर्यंत दाखवा - तुकाराम मुंढे