ETV Bharat / state

वेळेत स्थानकात या, अन्यथा तुमची गाडी चुकू शकते, कोकण रेल्वेकडून विशेष सूचना - ratnagiri breaking news

वारंवार सूचना करुनही तपासणीसाठी रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वेने आता कडक पावले उचलली आहेत. यामुळे रेल्वे सुटण्याच्या किमान पाऊण तास आधी न आलेल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश करण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

कोकण रेल्वे
कोकण रेल्वे
author img

By

Published : Oct 27, 2020, 5:54 PM IST

रत्नागिरी - वारंवार सूचना करुनही तपासणीसाठी रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वेने आता कडक पावले उचलली आहेत. आजपासून (दि. 27 ऑक्टोबर) उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वे आजपासून रत्नगिरी, सिंधुदुर्गातील सर्वच स्थानकात या बाबतची कडक अंमलबजावणी करणार आहे.

कोविडचा धोका पूर्णतः टळलेला नाही, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे. यासाठी रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी प्रवाशांनी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे, असे आवाहन गेले काही दिवस कोकण रेल्वे करत आहे. या आवाहनाला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र, काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार आहे. यामुळे ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर रहावे लागण्याची भीती आहे.

कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वे सर्व त्या खबरदारी घेत आहे. केले जाणारे सर्व उपाय हे प्रवाशांच्या आरोग्याच्या हिताचे आहेत. या सगळ्यासाठी कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी सर्व स्थानकात अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाश्यांची साथ अपेक्षित आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर, निर्धारित वेळेपूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचा, अन्यथा सुरक्षा तपासणी झाली नाही तर तुमची रेल्वे चुकू शकते.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांवर राणेंनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे सडेतोड प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.