ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, धरणाच्या पाणीपातळीत वाढ - रत्नागिरी पाऊस अपडेट

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. या पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 46 धरणांपैकी 30 धरणं ही 100 टक्के भरली आहेत. तर 16 धरणात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

धरणाच्या पाणीपातळीत वाढ
धरणाच्या पाणीपातळीत वाढ
author img

By

Published : Jun 19, 2021, 3:44 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. या पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या 46 धरणांपैकी 30 धरणं ही 100 टक्के भरली आहेत. तर 16 धरणात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने 30 धरणं 100 टक्के भरली आहेत. विशेष म्हणजे पावसाचा पहिला महिना संपण्याआधीच ही धरणं भरली आहेत. उर्वरीत 16 धरणं ही 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. यामध्ये मंडणगड तालुक्यातील 2, दापोलीतील 3, खेड मधील 6, चिपळूणमधील 7, गुहागरमधील 1, संगमेश्वरमधील 4, रत्नागिरीतील 1, लांजा तालुक्यातील 3, राजापूरमधील 3 अशी 30 धरणे ही 100 टक्के भरली आहेत. दरम्यान रत्नागिरी परिसरातील शीळ धरण 100 टक्के भरलं असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

कोणती धरणं 100 टक्के भरली

मंडणगड - पणदेरी, चिंचाळी

दापोली - सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी

खेड - शिरवली, शेलडी, पिंपळवाडी, तळवट, कोंडीवली, कुरवळ

गुहागर - गुहागर

चिपळूण - फणसवाडी, मालघर, कळंवडे, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल

संगमेश्वर - तेलेवाडी, कडवई, गडनदी, गडगडी,

रत्नागिरी - शिळ

लांजा - व्हेळ, गवाणे, मुचकुंदी,

राजापूर - ओझर, गोपाळवाडी, वाटूळ

या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे, 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, धरणाच्या पाणीपातळीत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.