ETV Bharat / state

Gauri Festival : गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा - happy gauri pujan

गौरीचे आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आगमन झाले. नागरिकांनी कोरोनाचे नियम पालत अत्यंत साध्या पद्धतीने गौरीचे आगमन केल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रात सर्वत्र गौरी स्थापना होत असली तरी तिच्या आगमनाच्या परंपरेमध्ये आपल्याला विविध ठिकाणी साम्य दिसून येते. अशीच कोकणातही गौरीचे वेगळ्या पद्धतीने आगमन केल्या जाते. त्याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट.

Gauri Festival : special tradition of Gauri's arrival in Konkan

author img

By

Published : Sep 12, 2021, 6:19 PM IST

रत्नागिरी - गणेशोत्सवात महिला वर्ग ज्यांची आतुरतेने वाट बघत असतात, त्या गौरीमातेचे आज सर्वत्र ठिकठिकाणी उत्साहात आगमन झाले. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने ढोल-ताशांच्या गजराशिवाय अगदी साध्या पद्धतीने पण भक्तिमय वातावरणात गौरीमातेची गाणी म्हणत गौरीमातेचे आगमन करण्यात आले. महाराष्ट्रात सर्वत्र गौरी स्थापना होत असली तरी तिच्या आगमनाच्या परंपरेमध्ये आपल्याला विविध ठिकाणी साम्य दिसून येते. अशीच कोकणातही गौरीचे वेगळ्या पद्धतीने आगमन केल्या जाते. त्याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट.

गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा

गौरीचा मुखवटा पाणवठ्यावरून गाणी गात घरी आणतात -

कोकणात महिला गौरीचे आगमन अनोख्या पद्धतीने करतात. पाणवठ्यावरुन गौरी घरी आणण्याची परंपरा आहे. कोकणात गौरीला ग्रामीण भाषेत 'गवर' असेही म्हणतात. विशेषत ग्रामीण भागात आज (रविवार) अत्यंत पारंपारिक पद्धतीने गौराईचे आगमन झाले. ग्रामीण भागात खड्याची गवर तसेच मुखवट्याची गवर आणण्याची परंपरा आहे. गौरीच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी ताम्हनात घरी आणल्या जातात. काही ठिकाणी तेरड्याचीही गवर असते. या गौरी घरी आणत असताना खास गौरीची गाणी म्हटली जातात. गौरीचा मुखवटा पाणवठ्यावरुन घरापर्यंत सुहासीनी घेवून येतात. घराच्या उंबऱ्यावर आलेल्या गौरीचे स्वागत होते. आणि गौरी आगमनाने गणपती बाप्पाच्या सणात आणखी भर पडते. दरम्यान, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने गौरीमातेचे आगमन झाले. मात्र महिला वर्गाचा उत्साह काही कमी झालेली नाही.

Gauri Festival : special tradition of Gauri's arrival in Konkan
गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा

'असा' दाखवतात नैवेद्य -

कोकणातील अनेक गावातील घरामध्ये लाकडाच्या पूर्णाकृती गौरी असतात. दरवर्षी या गौरींना नव्या वस्त्रालंकारानी सजवले जाते. अनेक घरांंमध्ये गौरीचे वर्षानुवर्षाचे खऱ्या सोन्याचे दागिनेही असतात. कोकणात आज म्हणजेच आगमनाच्या दिवशी गौरीसाठी काही ठिकाणी भाजी भाकरी केली जाते, तर काही ठिकाणी गोड नैवेद्य केला जातो. दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी कोकणात अनेक ठिकाणी तिखट सण अर्थात गौरीला तिखट नैवेद्य दाखवला जातो. आज व उद्या रात्रभर गौराईचा जागर केला जाणार आहे.

हेही वाचा - Gauri Festival : 'अशी' आहे गौरी सणाची परंपरा; पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.