रत्नागिरी - चिपळूण येथे खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 80 लाखांची 2 खवले मांजरे जप्त देखील करण्यात आली आहेत.
हेही वाचा - आशियाई चित्ता होता भारताची ओळख, त्याची जागा आफ्रिकन चित्ता घेणार का?
चिपळूण शहरानजीक मुंबई-गोवा महामार्गावर फरशी तिठा येथे खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संदीप पवार, विजय मोरे, मनोज मिरजोळकर, सुनील मालुसरे, आत्माराम सापटे यांना ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी खेड मंडणगड चिपळूण परिसरातील आहेत. त्यांच्याजवळ दोन जिवंत खवले मांजर सापडली आहेत. या दोन खवल्या मांजरांची किंमत ८० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे खवल्या मांजरांची तस्करी होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पाळत ठेवली होती. आरोपी व्यवहार करण्यासाठी तेथे आल्यावर पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
हेही वाचा - आता विहीर शोधून द्या.. नाही तर आत्महत्या करतो, हिंगोलीतील शेतकऱ्याचा इशारा