ETV Bharat / state

रत्नागिरी शहरातही आढळले मृत कावळे

author img

By

Published : Jan 16, 2021, 7:40 PM IST

Updated : Jan 16, 2021, 7:47 PM IST

उद्यमनगर येथील महिला रुग्णालय येथे 2 कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडून मृत कावळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Ratnagiri
Ratnagiri

रत्नागिरी - शहरात अचानक मृत पक्षी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी शहरातील उद्यमनगर येथील महिला रुग्णालय येथे 2 कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाकडून मृत कावळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सुरुवातीला दापोलीत शिरकाव

जिल्ह्यातील दापोली तालुक्यात काही दिवसांपूर्वी मृत कावळे आढळले होते, या कावळ्यांचा मृत्यू बर्ड प्लूने झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुहागरमध्ये मृत कावळे आढळले होते, तर रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे तर पांढरा समुद्र आणि मच्छीमार्केट परिसरातदेखील मृत पक्षी आढळून आले होते.

उद्यमनगर येथे आढळले मृत कावळे

आज रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे कावळे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे मृत कावळे पुढील तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्याची प्रक्रिया सध्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात बर्ड प्लूचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Last Updated : Jan 16, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.